Arvind Kejriwal  Sarkarnama
देश

ED Raid Delhi : मोठी बातमी ! केजरीवालांची चौकशीला दांडी ? ईडी अ‍ॅक्शन मोडवर; बड्या नेत्याच्या घरी छापा

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य धोरण परवाना वाटप घोटाळ्याप्रकरणी तब्बल पाचवेळा समन्स बजावले. पण केजरीवालांनी चौकशीला दांडी मारली.

Ganesh Thombare

Delhi News: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरु आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य धोरण परवाना वाटप घोटाळ्याप्रकरणी तब्बल पाचवेळा समन्स बजावले. मात्र तरीही मुख्यमंत्री केजरीवाल हे चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. यानंतर आता ईडी अॅक्शन मोडवर आली असून मंगळवारी सकाळीच अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिवांच्या घरावर छापा टाकला आहे. (ED Raid Delhi)

केजरीवाल यांच्यानंतर कॅबिनेटमधील मंत्री आतिशी या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन ईडीबाबत मोठे खुलासे करणार होत्या. मात्र, त्याआधीच अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. तसेच 'आप'च्या एका नेत्याच्या घरीही ईडी पोहोचल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ईडीच्या टीमने आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर छापे टाकले असून 10 हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. त्यामुळे आता ईडीच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिल्लीत हालचालींना वेग आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अचानक दाखल झाले होते. आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या 'हॉर्स ट्रेडिंग'च्या आरोप प्रकरणात क्राइम ब्रँचची टीम केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती.

आम आदमी पक्षाच्या आमदारांना भाजप विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. 'आप'चे तब्बल 21 आमदार फोडण्याची भाजपची योजना असल्याचा गंभीर आरोप केजरीवालांनी केला होता. यानंतर क्राइम ब्रँचची टीम केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिवांच्या घरी ईडी दाखल झाल्यामुळे केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT