MP Sanjay Singh  Sarkarnama
देश

ED Action On Sanjay Singh : मोठी बातमी ! दिल्लीतील मद्य घोटाळ्यात खासदार संजय सिंहांना ईडीकडून अटक

Ganesh Thombare

Delhi News: आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 तासांच्या चौकशीनंतर खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली. या विरोधात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात संजय सिंह यांच्या निवासस्थानावर आज सकाळी छापे टाकण्यात आले होते, तर यापूर्वी संजय सिंह यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. मद्य घोटाळ्याच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव होते. या बरोबरच संजय सिंह यांच्याशी संबंधित लोकांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी गेल्या एक वर्षापासून तपास यत्रणांकडून छापेमारी सुरू आहे. बुधवारी सकाळपासूनच खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तळ ठोकला होता, तर तब्बल संजय सिंह यांची या प्रकरणात 10 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

तर काही दिवसांपूर्वी दिल्ली दारू घोटाळा प्रकरणातच 'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांना फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. ते अद्याप तुरुंगातच आहेत, तर आता याच प्रकरणात संजय सिंहांना अटक झाली आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT