New Delhi : संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर 25 राजकीय पक्षांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सरकारचं निमंत्रण स्वीकारलं आहे.
मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं नवीन संसद भवनाच्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावं ही मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणार आहेत. दरम्यान, यावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. विरोधकांनी या उद्घाटन सोहळ्यावरुन मोदी सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. संसद भवनाच्या सोहळ्यावरुन दरम्यान हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला.
नवीन संसद भवनाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळली आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)त दाखल करण्यात आली होती. सी.आर. जयसुकिन नावाच्या वकिलाने ही याचिका दाखल केली होती. याचिकेवर शुक्रवारी(दि.27) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि पी.एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर होणार होती . परंतु ही याचिका न्यायालयाने दाखलही करुन घेतली नाही. सी.आर. जयसुकिन नावाच्या वकिलाने ही याचिका दाखल केली होती.
कलम 85 नुसार राष्ट्रपती संसदेचं सत्र बोलवतात. तसेच 87 नुसार त्याचं संसदेत अभिभाषण देखील होतं. ज्यामध्ये राष्ट्रपती दोन्ही सदनांना संबोधित करतात. तसेच संसदेमधील सगळी विधेयकं ही राष्ट्रपतींच्या मंजुरीनेच कायदेशीर केली जातात. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.यात काँग्रेस, द्रमुक, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि एमडीएमके अशा काही प्रमुख 19 पक्षांनी विरोध दर्शवला आहे.
...तर 25 पक्षांचा पाठिंबा दर्शवला!
विरोधी 4 पक्षांसह एकूण 25 पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्याला पाठिंबा दर्शवला आहे. यात भाजप, शिंदे गट, पंजाबमधील अकाली दल, YSRCP पक्ष, बीजू जनता दल, बसपा अशा विविध 25 पक्षांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.