Priyanka Gandhi VS PM Modi  Sarkarnama
देश

PM Modi VS Priyanka Gandhi: मोठी बातमी ! पंतप्रधान मोदींच्या विरुद्ध प्रियंका गांधी वाराणसीतून लढणार ?

Narendra Modi VS Priyanka Gandhi: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडला प्रस्ताव

Ganesh Thombare

Delhi News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया' आघाडीची दिल्लीत मंगळवारी (19 डिसेंबर) महत्वाची बैठक झाली. या बैठकीत 28 घटक पक्ष सहभागी झाले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात तसेच जाहीर सभा कुठे घ्यायच्या ? आदी मुद्यांवर चर्चा झाली. तसेच याच बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

याबरोबरच ममता बॅनर्जी यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव बॅनर्जी यांनी मांडला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडीतील जागावाटप राज्य स्तरावर ?

'इंडिया' आघाडीचे जागावाटप कसे असेल, याबाबत अनेक सवाल बऱ्याच दिवसांपासून उपस्थित करण्यात येत होते. दिल्लीतील बैठकीत जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली असून आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा निर्णय हा राज्य स्तरावर करण्याचे ठरल्याची माहिती आहे. मात्र, दिल्ली आणि पंजाबमधील जागावाटप हे नंतर ठरवण्याचे ठरले आहे. तर येत्या 30 जानेवारीपासून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 'इंडिया' आघाडीचा संयुक्त प्रचार सुरू होईल, अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिली.

बैठकीला कोण-कोण उपस्थित होते ?

'इंडिया' आघाडीच्या या बैठकीला 28 पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, (Mamata Banerjee) राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, डाव्या पक्षाचे नेते डी.राजा यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

खर्गेंच्या नावाला बॅनर्जींचा दुजोरा

विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडला. यावर आता खुद्द ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, 'इंडिया' आघाडीत पीएमपदाचा उमेदवार कोण ? यावर सर्वत्र चर्चा सुरू आहेत. लोक देखील याबाबत प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गें यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, असो बॅनर्जी म्हणाल्या.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT