Delhi News: काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन लोकसभा सचिवालयाने मागे घेतल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र देखील जारी करण्यात आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन करण्यात आले होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर बोलताना खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मणिपूरच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याचवेळी चौधरींनी नरेंद्र मोदींची तुलाना नीरव मोदीशी केली होती. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
यानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. या समितीने पुढील निर्णय येईपर्यंत चौधरी निलंबित राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, आता या विशेषाधिकार समितीने खासदार अधीर रंजन चौधरींचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अधीर रंजन चौधरींचे निलंबन मागे घेण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता ते पुन्हा एकदा सभागृहात विरोधकांची बाजू जोरदारपणे मांडण्याची शक्यता आहे. अधिवेशनात अधीर रंजन चौधरींनी आक्रमकपणे प्रश्न विचारत मोदी सरकारला चांगलेच घेरले होते.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.