Congress News : Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसला पुन्हा मोठा झटका? राजगोपालाचारी यांचे पणतू भाजपात जाण्याची शक्यता..

C R Keshvan Join bjp : तीन दिवसात काँग्रेसला तीन मोठे धक्के..

सरकारनामा ब्यूरो

Congress News : काँग्रेसला तीन दिवसांत सलग तिसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. सी राजगोपालाचारी (C Rajgopalchari) यांचे नातू सी आर केसवन भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. आता भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन हे भारतीय जनता पक्षात सामील होणार असल्याची बातमी आहे. मात्र याला अजूनही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन हे भारतीय जनता पक्षात सामील होणार असल्याची बातमी आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र केशवन यांनी महिनाभरापूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

नुकतेच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते ए. के. ॲंटनी (A. K. Antony) यांचे सुपुत्र अनिल ॲंटनी यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. हा काँग्रेसला मोठा धक्का मानण्यात येत होता. यानंतर आता, काँग्रेसला हा आणखी एक मोठा धक्का मानण्यात येतो.

अनिल ॲंटनी यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. या वेळी व्ही. मुरलीधरन आणि केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन उपस्थित होते. अनिल हे केरळ काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांचा निर्णय हे ए. के. ॲंटनी यांच्यासाठी धक्कादायक ठरल्याचे पुढे येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT