Bihar Assembly Election 2025 Sarkarnama
देश

Bihar Assembly Election : बिहारमध्ये कधी होणार निवडणूक, कोणते बदल? ज्ञानेश कुमार यांनी दिली महत्वपूर्ण माहिती...

Chief Election Commissioner Gyanesh Kumar’s Key Announcement : प्रत्येक मतदान केंद्रावर केवळ 1200 मतदार असतील. त्यापेक्षा एकही मतदार अधिक असणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Rajanand More

Election Commission’s Preparation and Schedule Update : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असताना दुसरीकडे भारतीय निवडणूक आयोगानेही आपली तयारी पूर्ण केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी बिहारमधील तयारी आढावा घेतला. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगताना त्यांनी यावेळी कोणते बदल असतील, निवडणुकीची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार यांसह विविध मुद्द्यांवर महत्वपूर्ण माहिती दिली.

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक 22 नोव्हेंबरच्या आता पूर्ण होणार असल्याचे ज्ञानेश कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे येत्या आठवडाभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये पहिल्यांच ईव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या एकूण जागांपाकी 38 मतदारसंघ एससी तर 2 मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित असणार आहेत. विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबरला समात्प होणार आहे. त्याआधीच निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आयोगाने यावेळी पहिल्यांदाच बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

प्रत्येक मतदान केंद्रावर केवळ 1200 मतदार असतील. त्यापेक्षा एकही मतदार अधिक असणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये यावेळ वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म लागू केला जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर 100 टक्के वेब कास्टिंग केली जाणार असल्याचे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.

ईव्हीएमवरील बॅलेट पेपरवर उमेदवारांच्या रंगीत फोटोंसह इतर माहितीही रंगीत असेल. यापूर्वी ही माहिती पांढऱ्या पेपरवर काळ्या रंगात लिहिलेली असायची. त्यामुळे अनेकदा ती स्पष्ट दिसत नव्हती, असे आयोगाकडून सांगण्यात आले. पोस्टल मतांची मोजणी यावेळी ईव्हीएममधील मतांच्या मोजणीच्या दोन फेऱ्यांआधीच पूर्ण केली जाईल, असेही ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच मतदारयाद्यांची पुर्नपडताळणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत जवळपास 65 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. त्यानुसार बिहारमधील मतदारसंख्या सध्या 7 कोटी 42 लाखांवर पोहचली आहे. या प्रक्रियेवरून बराच वाद झाला होता. निवडणूक आयोगाकडून नुकतीच ही प्रक्रिया पूर्ण केली. आता मतदारयादी शुध्द झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT