File Photo of BJP celebration Sarkarnama
देश

BJP Vice President Resign : भाजपला धक्का: प्रदेश उपाध्यक्षाने दिला राजीनामा

राजीनामा देताना नेत्याने पक्षातील गैरकारभारावरही निशाणा साधला आहे.

सरकारनामा ब्युरो

BJP Vice President Resign : बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. बिहार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव रंजन यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (३० डिसेंबर) राजीव रंजन यांनी बिहार भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी बिहार भाजपमध्ये सुरु असलेल्या कारभारावरुन संतापही व्यक्त केला आहे. राजीव रंजन यांनी पक्षावर अनेक आरोप केले आहेत.

''आज बिहार भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या धोरणांपासून आणि आदर्शांपासून पूर्णपणे भरकटली आहे. 'सबका साथ-सबका विकास' ही पंतप्रधानांची चर्चा केवळ म्हणण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. आज पक्षावर मागास/अधिक मागास आणि दलितविरोधी घटकांचे वर्चस्व आहे. परिस्थिती अशी आहे की, मागासलेल्या समाजाचे नसलेले नेतेही या समाजाच्या नावावर अनेक दशके सत्ता उपभोगत आहेत, अशी खंत राजीव रंजन यांनी पत्रातून मांडली आहे.

'पक्षाचा अजेंडा फक्त पाटण्यापुरता मर्यादित'

तसेच, त्यांच्या काही आवडत्या नेत्यांशिवाय, पक्षातील मागास/अति मागास आणि दलित समाजातील नेत्यांचा वापर केवळ झेंडा घेऊन जाण्यापुरता मर्यादित झाला आहे. पंतप्रधानांच्या धोरणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. तसेच पक्षाचा अजेंडा केवळ पाटण्यापुरता मर्यादित राहिला आहे. नालंदा जिल्ह्याची चर्चा नाही. नालंदा आणि इतर जिल्ह्यांकडे हे निव्वळ दुर्लक्ष होत आहे. असे परिसरातील जनतेने विचारले असता, आम्हाला उत्तरही देता येत नाही, असही राजीव रंजन यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे हा राजीनामा स्वीकारण्यात यावा आणि पक्षाने दिलेल्या जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी विनंती राजीव रंजन यांनी पत्रातून केली आहे. इतरही अनेक विषय आहेत, ज्यावर पक्षात एकमत होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रात फारसे विषय लिहित नसले तरी येणाऱ्या काळात ते मांडत राहणार असल्याचे राजीव रंजन यांनी पत्रातून म्हटले आहे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT