Nitish Kumar, Lalu Prasad Yadav Sarkarnama
देश

Bihar By Poll Election 2024 Result: लालू प्रसाद यादव अन् नितीश कुमारांचा 'करेक्ट कार्यक्रम' करत अपक्ष उमेदवाराने मारली बाजी

Lalu Prasad Yadav And Nitish Kumar : 'आरजेडी'च्या उमेदवार बीमा भारती, जेडीयूचे उमेदवार कलाधर मंडल आणि अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांच्यात रुपौली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत झाली.

Deepak Kulkarni

By Election Result 2024 : लोकसभा निवडणुकी पाठोपाठ आता इंडिया आघाडीने पुन्हा एकदा भाजपला जोर का झटका दिला आहे. सात राज्यांतल्या 13 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने आपली शानदार कामगिरी कायम राखली आहे.13 पैकी तब्बल 10 जागा इंडिया आघाडीने जिंकल्या आहेत तर भाजपला अवघ्या 2 जागांवर विजय मिळवता आल्या आहेत.

सत्ता स्थापन केल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला मानहारीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहेत.अशातच आता बिहारमध्ये एका जागेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत थेट आरजेडीचे लालू प्रसाद यादव आणि जेडीयूचे नितीश कुमारांना (Nitish Kumar) एका अपक्ष उमेदवाराने धक्का दिला आहे.

बिहारमधील रुपौली विधानसभा मतदारसंघामध्ये ही पोटनिवडणूक पार पडली.ही निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. अखेरच्या क्षणापर्यंत अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे.नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांना धक्का देत तिथे अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी विजय खेचून आणला आहे.

आरजेडीच्या उमेदवार बीमा भारती, जेडीयूचे उमेदवार कलाधर मंडल आणि अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांच्यात रुपौली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत झाली. या लढतीत अपक्ष शंकर सिंह यांनी जेडीयूच्या कलाधर मंडल यांना 8 हजार 246 मतांनी धोबीपछाड दिला. त्यांना 68 हजार 070 तर कलाधर मंडल यांना 59 हजार 824 मतं मिळाली.आरजेडीच्या बीमा भारतींना 30 हजार 619 मतं मिळवता आली.

जनता दलामधून आरजेडीमध्ये प्रवेश केल्यानंतर बीमा भारती यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. पण या लढतीत भारती यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलाने त्यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तिकीट दिले होते.

देशातील पश्चिम बंगालमधील 4, हिमाचल प्रदेशमधील 3, उत्तराखंडमधील दोन आणि मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण 13 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली होती. त्या पोटनिवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. त्यात पश्चिम बंगालमधील चारही जागांवर तृणमूल काँग्रेसनं ( TMC ) एकहाती विजय मिळवला आहे. उत्तराखंडमधील दोन्ही जागांवर काँग्रेसनं दमदार बाजी मारली आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा ( Congress ) दोन, तर भाजपचा एक जागेवर विजय झाला आहे.

बिहारमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.तर,तामिळनाडूत द्रमूकच्या ( डीएमके ) उमेदवारानं 'पीएमके'च्या उमेदवाराचा पराभव केला आहे. पंजाबमध्ये एका जागेवर आपनं भाजपवर मात करत विजय खेचून आणला आहे. तर, मध्य प्रदेशातील एका जागेवर झालेल्या लढतीत भाजपनं काँग्रेसला पराभूत केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT