CM Nitish Kumar
CM Nitish Kumar Sarkarnama
देश

JD(U)-BJP कशावरुन बिनसले? मोदींनी सांगितले कारण, नितीशकुमारांचेही प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो

(Nitish Kumar | Tejashwi Yadav| JD(U) | RJD)

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांना उपराष्ट्रपती व्हायचे होते. त्याबाबत त्यांनी बोलणी देखील केली होती. मात्र ही बोलणी यशस्वी न झाल्यानेच नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले असा मोठा दावा भाजपचे खासदार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला. बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले, नितीशकुमार यांची उपराष्ट्रपती होण्याची इच्छा होती. त्यासाठी जेडीयूच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपाशी संपर्क साधत शक्यता पडताळून पाहिली होती. (Nitish Kumar | Tejashwi Yadav| JD(U) | RJD)

नितीशकुमार यांनी मात्र सुशील मोदींचा हा दावा फेटाळून लावला आहे. माझी अशी कोणतीही इच्छा नव्हती असे नितीशकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. हा एक विनोद आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

नितीशकुमार म्हणाले, मला उपराष्ट्रपती होण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. कसला विनोद करत आहेत, माझी अशी कोणतीही इच्छा नाही. त्यांच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला आम्ही कितपत पाठिंबा दिला हे विसरले का? आम्ही निवडणूक संपण्याची आणि त्यानंतर बैठक बोलावण्याची वाट पाहत होतो, त्यांना हवं तितकं बोलू द्या” असेही नितीशकुमार यांनी सांगितलं. (Nitish Kumar | Tejashwi Yadav| JD(U) | RJD)

नितीशकुमार यांनी नुकताच भाजपसोबत काडीमोड घेत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत महागठबंधनची वाट धरली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी (Amit Shah) न पटल्यानेच त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून जेडीयू आणि भाजपमधील तणाव शिगेला पोहोचला होता. शहा हे सतत जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोप नितीश कुमारांनी केला होता. पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला होता. (Nitish Kumar | Tejashwi Yadav| JD(U) | RJD)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT