Nitish Kumar Sarkarnama
देश

Nitish Kumar : नितीश कुमारांनी धरले भाजपच्या माजी खासदाराचे पाय; VIDEO व्हायरल, कारण आले समोर...

Bihar CM RK Sinha : आदि चित्रगुप्त मंदिर नोजर घाट परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी झाले होते.

Rajanand More

Patna News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या माजी खासदाराचे पाय धरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. राज्याची राजधानी पटना येथील आदि चित्रगुप्त मंदिर नोजर घाट परिसरात आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. यामागचे कारणही समोर आले आहे.

भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार आर. के. सिन्हा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी झाले होते. नितीश कुमार यांच्या सुचनेनुसार मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी सिन्हा हे भाषणादरम्यान त्यांचे आभार मानत होते. भाषण सुरू असतानाच नितीश कुमार जागेवरून उठले आणि त्यांनी सिन्हा यांचे पाय धरले.

नितीश कुमार यांनी सिन्हा यांचे पाय धरताच उपस्थितांनाही क्षणभर काही समजले नाही. मात्र, त्यानंतर सिन्हा यांचे अभिनंदन करण्याच्या उद्देशाने ही कृती केल्याचे मानले जात आहे. सिन्हा हे नितीश कुमार यांच्यापेक्षा वयाने मोठे असून धार्मिक कार्यामध्ये सक्रीय असतात. या भावनेतूनच नितीश कुमारांनी त्यांचे पाय धरल्याची चर्चा आहे.

नितीश कुमारांचे कौतुक

आर. के. सिन्हा यांनी भाषणावेळी नितीश कुमार यांचे तोंडभरून कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी मंदिराकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्यामुळे मंदिरातील सर्व व्यवस्था ठीक झाली. मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम त्यांच्यामुळे शक्य होऊ शकल्याचे सिन्हा यांनी यावेळी सांगितले.

व्हिड़िओ व्हायरल

नितीश कुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावर उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. पुढील काही महिन्यांत बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीला निवडणुकीशीही जोडले जाऊ लागले आहे. नितीश कुमारांचा पक्ष भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी आहे. एनडीए सरकारने बिहारला अर्थसंकल्पात विशेष पॅकेजही दिले आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT