पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (cm nitish kumar)हे अपघातातून बचावल्याची माहिती समोर येत आहे. यात ते किरकोळ जखमी झाले आहे. शनिवारी गंगा नदीमध्ये ही घटना घडली. (cm nitish kumars steamer accident news update)
शनिवारी छट पुजेपूर्वी गंगा नदीच्या घाटांची पाहणी करण्यासाठी ते गेले होते.त्यांच्या (स्टीमर) बोटीला हेलकावे बसल्यामुळे ही बोट जे पी सेतुच्या खांबाला धडकली. बोटीवरील अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने नितीश कुमार यांच्यावरील जीवघेणे संकट टळले.
बोटीला बसलेल्या जोरदार धक्क्यामुळे नितीशकुमार बोटीत कोसळले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र या घटनेनंतर बोटीवरील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. तयावेळी त्यांच्यासोबत प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी तत्परतेने त्यांना गंगा नदीतून दुसऱ्या बोटीने नदीच्या बाहेर काढले, त्यामुळे मोठा अपघात टळला.
नितीश यांची बोट पाण्याच्या प्रवासोबत वाहत जात होती. पण अधिकाऱ्यांनी नितीश यांना दुसऱ्या बोटीद्वारे सुखपूर किनाऱ्यावर आणले. गेल्या काही दिवसापासून बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. गंगा नदीला सध्या मोठा पूर आला आहे. त्यामुळे बोट हेलकावे देत जे पी सेतुच्या खाबांला धडकली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.