Bihar hijab row : मुख्यमंत्री नितीशकुमार चांगलेच वादात सापडले आहेत. पाटणा इथल्या एका कार्यक्रमात महिला डाॅक्टराचा त्यांनी हिजाब ओढला आहे. यावरून बिहारमध्ये आंदोलन सुरू झाली असून, सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवली आहे. अखिल भारतीय प्रगतिशील महिला असोसिएशनने बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निषेध आंदोलन सुरू केली आहेत.
नितीशकुमार यांचा मित्रपक्ष भाजपने देखील त्यांना या मुद्यावर एकटं पाडत धार्मिक वादात तेल ओतणारी विधानं केली जात आहेत. दरम्यान, झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांनी बिहारमधील हिजाब वादात उडी घेत, महिला डॉ. नुसरत यांना मासिक 3 लाख पगार आणि झारखंड आरोग्य विभागात त्यांच्या पसंतीची पोस्टिंग देण्याची घोषणा केली आहे.
पाटणा इथं आयुष विभागाच्या एका महिला डॉक्टरला प्रमाणपत्र प्रदान करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (NitishKumar) यांनी सर्वांसमोर तिचा हिजाब खाली ओढला. यावरून आता बिहारसह देशभरात नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण पेटू लागलं आहे. अखिल भारतीय प्रगतिशील महिला असोसिएशनने बिहारमध्ये आंदोलन सुरू केली आहेत.
या घटनेमुळे केवळ एका महिला डॉक्टरचा स्वाभिमान दुखावला गेला नाही, तर संपूर्ण बिहारमधील (Bihar) महिलांचा अपमान झाला आहे, असे सांगत संघटनेच्या सरचिटणीस मीना तिवारी यांनी बिहारमधील एनडीए सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्र्यांचे असे वर्तन निषेधार्ह आणि अस्वीकार्ह आहे. ही घटना महिलांची मर्यादा, खासगी अधिकार आणि घटनात्मक स्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असेही मीना तिवारी यांनी म्हटलं आहे.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांना या कृत्यासाठी शरम वाटायला हवी. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणार असल्याचा इशारा देता, हे आंदोलन सुरूच राहणार आहे. या लाजिरवाण्या घटनेनंतर भाजपकडून धार्मिक तेढ पसरविणारी विधाने केली जात आहेत. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. सत्तेच्या आवरणाखाली महिला आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांवर हल्ला करण्याची ही प्रवृत्ती लोकशाहीला घातक आहे, भाकप (माले) माजी आमदार महबूब आलम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ‘चेहरा पाहिल्याशिवाय कोणालाही नियुक्तीपत्र देता येईल? असा सवाल राज्यातील भाजप ओबीसी मोर्चाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केला. महिला आणि पुरुषांचा चेहरा पाहिल्यानंतरच मतदान करण्याची परवानगी देण्याची अजब मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली.
बिहारच्या या हिजाब वादात झारखंडचे आरोग्य मंत्री इरफान अन्सारी यांनी उडी घेतली आहे. महिला डॉक्टर नुसरत यांना मासिक 3 लाख पगार आणि झारखंड आरोग्य विभागात त्यांच्या पसंतीची पोस्टिंग देण्याची घोषणा केली आहे. झारखंडमध्ये डॉक्टर, मुलगी किंवा महिलेच्या सन्मानाशी तडजोड करणे अशक्य आहे. बिहारमधील डॉक्टरांशी संबंधित ही अश्लील घटना आपल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना खूप दुखावते, असाही घणाघात इरफान अन्सारी यांनी केला.
आरोग्यमंत्री इरफान अन्सारी पुढे म्हणाले, "झारखंड सरकारचा हा निर्णय केवळ नियुक्ती नाही, तर महिलांच्या स्वाभिमानाचा, मानवी प्रतिष्ठेचा आणि संवैधानिक मूल्यांचा विजय आहे." झारखंड सरकारचा हा निर्णय इतिहासात एक संवेदनशील, धाडसी आणि मानवतावादी कृती म्हणून नोंदवला जाईल. एकीकडे अपमान होत असताना, झारखंडने मोठे हृदय दाखवले आहे आणि मानवतेचा झेंडा उंचावला आहे, असेही मंत्री अन्सारी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.