Court
Court File Photo
देश

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास सहा महिने महिलांची कपडे धुण्याची शिक्षा

सरकारनामा ब्युरो

पटना : अनेकदा न्यायालयांनी दिलेल्या शिक्षा चर्चेचा विषय ठरतात. अशाच एका शिक्षेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बिहार राज्यातील मधुबनी येथील न्यायालयानं बलात्काराचा प्रयत्न करण्यास शिक्षा म्हणून संबंधित पीडितेचे सहा महिने कपडे धुवून त्याला इस्त्री करण्याची शिक्षा दिली आहे. आरोपीला जामीन देताना न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

मधुबनीमधील झांझरपूर न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अविनाश कुमार यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना हा आदेश दिला आहे. लालन कुमार सफी असं आरोपीचं नाव आहे. महिलांची कपडे पुढील सहा महिने मोफत धुवून देण्याच्या अटीवर त्याला जामीन देण्यात आला आहे.

वीस वर्षांचा लालन हा धोबी आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो कोठडीत होता. त्याच्या वकिलाने न्यायालयात बाजू मांडताना तो वीस वर्षांचा असल्याने त्याला माफ करण्याची मागणी केली होती. तसेच आरोपीला त्याच्या व्यावसायिक कामातून समाजाची सेवा करण्याची तयारी असल्याचंही वकिल म्हणाले होते.

वकिलांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं संबंधित आरोपीला मंगळवारी जामीन मंजूर केला. पण हा जामीन देताना त्यांनी आरोपीला सर्व महिलांचे कपडे धुवून व इस्त्री करून देण्याची शिक्षा दिली आहे. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपयांचे दोन हमीपत्रांवर जामीन देण्यात आला.

आरोपीविरोधी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून पोलिसांचा तपासही पूर्ण झाला आहे. तसेच दोन्ही बाजून समझोतासाठी अर्जही करण्यात आला आहे. सहा महिन्यांनी संबंधित आरोपीला मोफत सेवा दिल्याचे प्रमाणपत्र गावातील सरपंच किंवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडून घ्यावे लागणार आहे.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अविनाश कुमार यांनी यापूर्वीही असे निकाल दिले आहेत. एका लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरू केली म्हणून एका शिक्षकाला न्यायाधीशांना गावामध्ये मुलांना मोफत शिकवण्याची शिक्षा दिली होती. या शिक्षकाविरोधात ऑगस्ट 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT