Bihar Political News, Tejashwi Yadav Latest News Sarkarnama
देश

Tejahswi Yadav : उपमुख्यमंत्र्यांनी 'या' सहा टिप्स् फॉलो करण्याचा मंत्र्यांना दिला कानमंत्र

Tejahswi Yadav : मंत्र्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपल्या विभागासाठी नवीन गाडी घेऊ नये.

सरकारनामा ब्युरो

पाटना: भाजपला सोडचिठ्ठी देऊन नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये (bihar) सरकार स्थापन झाले आहे. मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (tejahswi yadav) यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे.

यापूर्वी सत्तेत असताना त्यांना आलेल्या अनुभवांमुळे तेजस्वी यादव आता प्रत्येक कृती काळजीपूर्वक करीत आहेत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना काही टिप्स् दिल्या आहेत. बिहारमध्ये सत्तेत असलेले तेजस्वी यादव आपल्यासोबतच सरकारची प्रतिमा जपण्याबाबत खूपच गंभीर असल्याचे चित्र आहे.

'सरकार कशा पद्धतीने चालवावे,' याबाबत तेजस्वी यादव यांनी फेसबूक, टि्वटवरुन आपल्या मंत्र्यांना सल्ला दिला आहे. तेजस्‍वी यादव यांनी आपल्या मागील कार्यकाळात त्यांना मिळालेल्या सरकारी बंगल्याची दुरुस्ती केली होती. यावरुन विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. या आरोपाला उत्तर देताना तेजस्वी यादव यांची त्यावेळी दमछाक झाली होती.

आपल्या राष्‍ट्रीय जनता दलाच्या मंत्र्यांना तेजस्वी यादव म्हणाले, "सध्या आपण सरकारमध्ये असलो तरी आपलं लक्ष्य़ पुढे आहे. पुढचा संघर्ष हा मोठा आहे. अशा परिस्थितीत कुठलीही चुक होणार नाही, याची काळजी घ्या. मंत्र्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपल्या विभागासाठी नवीन गाडी घेऊ नये,"

तेजस्वी यादव म्हणाले, "राष्ट्रीय जनता दलाच्या कोट्यातून मंत्री झालेल्यांनी आपल्या विभागातून स्वतःला वापरण्यासाठी कुठलीही गाडी खऱेदी करु नये. सरकारी मोठ्या बंगल्यासाठी धावपळ करु नका,"

आपल्या मंत्र्यांना सल्ला देताना तेजस्वी यादव म्हणाले..

  1. राजदचा कुठलाही मंत्री आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला आपले चरणस्पर्श करु देणार नाही.

  2. शिष्टाचार अन् अभिवादनासाठी हात जोडून नमस्कार किंवा प्रणाम करा.

  3. सौम्य आणि शालीन व्यवहार करा, धर्म आणि जातीचा भेदभाव न करता गरजूंना मदत करा.

  4. राजदच्या कोट्यातून मंत्री झालेल्या मंत्र्यांनी पुष्पगुच्छ न घेता शैक्षणिक वस्तूंची देवाण-घेवाण करावी. अशीच विनंती इतरांनाही करावी.

  5. आपल्या विभागात प्रामाणिक, पारदर्शक कारभाराला प्राध्यान्य द्या

  6. सर्व मंत्र्यांनी डिजिटल माध्यमांच्या आधार घेऊन जनतेच्या संपर्कात राहावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT