Bihar Election result : ‘दो हजार पच्चीस...फिर से नितीश...’ असा नारा बिहारमध्ये देण्यात आला, तेव्हा विरोधकांनी तो गांभीर्याने घेतला नाही, हेच बिहारच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. ‘नितीश-मोदी’ जोडीने सामाजिक समीकरणे ‘एनडीए’च्या बाजूने झुकवली आणि महाआघाडीचा सामाजिक पाया पूर्णपणे कोलमडला. तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यासाठी हा धक्का आहे.
‘एनडीए’ने केलेल्या प्रचारावर आणि निवडणूक रणनीतीवर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला आहे. दीड कोटी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतरही विरोधकांचे आरोप लोकांनी फेटाळून लावले. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी आपल्या प्रचारसभांमध्ये सातत्याने नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती.
बिहारमधील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार यासारखे मुद्देही निवडणूक निकालांमध्ये प्रतिबिंबित झाले नाहीत. विरोधकांच्या आरोपांचा मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही. निवडणुकीपूर्वीच नितीश सरकारने रोजगार सुरू करण्यासाठी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवले. यापूर्वी, निवृत्तीवेतनाचे पॅकेज आणि अशाच अनेक सवलतींमुळे मतदार संभ्रमित झाले होते. विशेषतः महिला मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले.
‘नोटा’ला १.८१ टक्के :
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये १.८१ टक्के म्हणजेच ६,६५,८७० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. २०२० मधील १.६८ टक्क्यांपेक्षा यंदाचे ‘नोटा’चे प्रमाण वाढले आहे. २०१५ मध्ये २.४८ टक्के मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला होता. एमआयएमला १.७५ टक्के मते मिळाली असून, ‘नोटा’ला त्यांच्यापेक्षा जास्त मतदारांनी पसंती दिल्याचे या आकडेवारीमध्ये दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.