Bihar Election Result 2025 Live Updatesछबिहार विधानसभेच्या पोस्टल मतमोजणी सुरुवात झाली आहे. पहिला ट्रेंड पोस्टल बॅलेट मोजणीतून समोर आला आहे. पहिला ट्रेंड प्रशांत किशोर यांच्या जनसूराज्यच्या बाजूने आला आहे.
प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती, पण त्यांचा पक्षानं जनसुराज्य पोस्टल मतमोजणीतून खाते उघडलं आहे. पीकेंचा पक्ष तीन ठिकाणी आघाडी आहे.
एनडीए 40 जागांवर आघाडी आहे, नितीश कुमार यांचे 12 मंत्री आघाडीवर आहे. भाजप 32, जेडीयू 19, एलजेपी 1, अन्य 1 जागेवर आघाडीवर आहे. आत्तापर्यत 100 जागांचा निकाल समोर येत आहे. तारापूरमधून सम्राट चौधरी आघाडीवर आहेत, राघोपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर आहेत. सुरवातीच्या कलांमध्य 50 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे.
बिहारचा पहिला कल भाजपच्या बाजूनं आला आहे. मोतामामधून जेडीयूचे अनंत सिंह आघाडीवर आहेत. एनडीएचे 3, आरजेडीचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत.
करकट मतदारसंघात भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह या पिछाडीवर आहेत. मतमोजणीपूर्वी ज्योती सिंह यांनी विजयाचा दावा केला होता आणि करकटचे लोक त्यांच्यासोबत असल्याचे म्हटले होते.
अलीनगरमधून BJP च्या मैथिली ठाकूर आघाडीवर असून अलीनगरमधून RJD चे विनोद मिश्रा पिछाडीव आहेत. प्रशांत किशोर यांचा जनसुराज 3 जागांवर आघाडीवर आहे.
जमुई विधानसभा येथून भाजपाच्या श्रेयसी सिंह आणि राजदचे मोहम्मद शमसाद आलम यांच्यात काटेकी टक्कर आहे. बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम कुटुंबा मतदारसंघात आघाडीवर आहेत, तर लालगंज मतदारसंघात शिवानी शुक्ला आघाडीवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.