Tejasvi Yadav Sarkarnama
देश

Bihar : लालू प्रसाद यादवांना ED चा दणका ; रोख रक्कम, दागिने जप्त ; तेजस्वी यादव यांची चौकशी...

Bihar Land for Jobs Scam News : यादव आणि कुटुंबियांकडून ७० लाख रुपयांची रक्कम, दोन किलो सोने, परकीय चलन, सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत.

सरकारनामा ब्युरो

Bihar Land for Jobs Scam News : सक्तवसुली संचालनालयाने (ED) जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी काल (शुक्रवारी) बिहारमध्ये छापेमारी करण्यात आली आहे.

आज (शनिवारी) बिहारचे उपमुख्यमंत्री, राजदचे नेता तेजस्वी यादव यांनी ईडीने समन्स बजावले आहे. आज त्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वी त्यांना ४ मार्च रोजी ईडीकडून समन्स् बजावले होते.

यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने राजदचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी यांची चौकशी केली आहे. दुसरीकडे बिहारमध्ये राजदच्या अनेक नेत्यांवर छापेमारी करण्यात येत आहे.

परकीय चलन, सोन्याची नाणी जप्त

सीबीआयने काल (शुक्रवारी) देशभरात २५ ठिकाणी छापेमारी केली होती. यात लालू प्रसाद यादव यांच्या कन्या, मुलगा तेजस्वी यादव आणि कुटुंबियांकडून ७० लाख रुपयांची रक्कम, दोन किलो सोने, परकीय चलन, सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत.

१५ मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहा..

रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी जमीनच्या बदल्यात रेल्वेत काही जणांना नोकरी दिली होती, याप्रकरणी त्यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे .

१५ मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी, कन्या मीसा भारती यांच्यासह १४ अन्य जणांना १५ मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

१२ जणांना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी..

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सौम्या राघवन, सीपीओ कमलदीप मैनराय, लाभार्थी राजकुमार सिंह, मिथिलेश कुमार, अजय कुमार, संजय कुमार, धर्मेंद्र कुमार, विकास कुमार, अभिषेक कुमार रवींद्र राय, किरण देवी, अखिलेश्वर सिंह, रामाशीष सिंह याचा या प्रकरणात समावेश आहे.

२००९ ते २००९ मधील हा प्रकार आहे. लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वेमंत्री होते. त्यांनी आपला पदाचा गैरउपयोग करुन १२ जणांना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी दिली होती. यातील सात जणांना जमीनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचे चौकशीत आढळले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT