Lalu Prasad Yadav, Jitan Ram Manjhi Sarkarnama
देश

Lalu Prasad Yadav News : लालूंची मोठी खेळी; भाजपसोबतच्या नेत्यालाच दिली उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर

Rajanand More

Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे. येत्या 28 जानेवारीला भाजपसोबतच्या सरकारचा शपथविधी असल्याचे माहिती समोर आली आहे. त्यातच सध्या नितीश कुमारांसोबत सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

बिहारसाठी पुढील एक-दोन दिवस महत्वाचे मानले जात आहेत. राज्यात पुन्हा सत्ताबदल होण्याची शक्यता असून नितीश कुमार पुन्हा एनडीएसोबत जाऊ शकतात. बिहारमध्ये (Bihar) सत्तास्थापनेसाठी 122 हा जादूई आकडा आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाचे केवळ ४५ आमदार असले तरी त्यांनी भाजपसोबत असताना आणि आता आरचेडीसोबतच्या सरकारमध्येही मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवण्यात यश मिळवले. पुन्हा भाजपसोबत गेल्यानंतरही ते मुख्यमंत्री असतील, हे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.

नितीश कुमारांकडून सातत्याने पलटी मारली जात असल्याने आता लालूंनीही कंबर कसली आहे. नितीशकुमारांनी (Nitish Kumar) साथ सोडल्यास लालूंना (LaluPrasad Yadav) आठ आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. सध्या आरजेडीकडे 79 आमदार आहेत. मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे (Congress) 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. या आमदारांचा एकूण आकडा 114 पर्यंत पोहोचतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एनडीएमधील माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा या पक्षाचे चार आमदार आहे. एमआयएम एक आणि अपक्ष एक आमदार आहे. मांझी यांच्याकडील चार आमदार मिळाल्यास आरजेडी जादुई आकड्याच्या अत्यंत जवळ पोहचू शकते. त्यामुळे लालूंनी जीतन राम मांझी यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचे समजते. त्याचप्रमाणे आघाडीमध्ये आल्यास लोकसभेच्या जागा देऊ, असेही आश्वासन दिले आहे.

नितीश कुमार भाजपसोबत गेल्यास या दोन्ही पक्षांचे आमदार 123 होतात. जादुई आकड्यापेक्षा एक आमदार अधिक आहे. मांझी यांच्या चार आमदारांमुळे सरकार भक्कम स्थितीत येते. त्यावर लालूंचा डोळा असल्याचे चित्र आहे. पण मांझी यांच्या मुलगा संतोष मांझी यांनीही लालूंची ही ऑफर फेटाळून लावल्याचे वृत्त आहे. आम्ही एनडीएसोबतच आहोत. अशा ऑफर येतच असतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नितीश कुमार हे भाजपसोबत गेल्यास मांझी यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी आहे बिहारमधील राजकीय स्थिती -

·         RJD: 79

·         BJP: 78

·         JD(U): 45

·         CONGRESS: 19

·         LEFT PARTIES: 16

·         HAM (S): 4

·         AIMIM: 1

·         IND: 1

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT