Bihar Politics : Sarkarnama
देश

Bihar Politics : 'महागठबंधन'मध्ये अनेक अडचणी, पक्षातील लोकांच्या आग्रहामुळे राजीनामा; नितीशकुमार स्पष्टच बोलले!

Nitish Kumar News : नितीशकुमार हे आता भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत

Chetan Zadpe

Bihar News : बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपला राजीनामा बिहारचे राज्यपाल राजेंद्र आरलेकर यांच्याकडेल सोपवला. राष्ट्रीय जनता दलासोबत काडीमोड घेत नितीशकुमार हे आता भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर नितीशकुमार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)

राजीनामा देऊन राजभवनातून बाहेर पडताना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. यावेळी नितीशकुमार म्हणाले, "महागठबंधन सरकारमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. माझ्या पक्षातील सर्व नेते, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, या सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. यामुळे आज राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन टाकला. आता महागठबंधन सरकार संपुष्टात आलं आहे. या सरकारमध्ये दीड वर्षानंतरही म्हणावी तशी चांगली परिस्थिती नव्हती, लोकांना सरकारची कामगिरी खराब वाटत होती. यामुळे आम्ही यातून वेगळे झालो, असे नितीशकुमार म्हणाले.

भाजपने सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या -

बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी (दि. 27 जाने) दिवसभर भाजपमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. ते राजभवनात मांडता यावे यासाठी पक्षाने सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री करण्याची योजना आखली आहे.

मात्र, उपमुख्यमंत्री म्हणून एकूण तीन नावांची चर्चा होती. हायकमांडच्या सूचनेनुसार शनिवारी बिहारमध्ये पोहोचलेले भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत कोअर कमिटीची छोटेखानी बैठक घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते हरी साहनी, माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद आणि अन्य नेत्यांसोबत सुमारे तासभर झाली.

बिहार विधानसभेत पक्षीय बलाबल -

* आरजेडी : 79

* भाजप : 78

* जेडीयू : 45

* काँग्रेस : ​​19

* माले : 12

* हम : 04

* सीपीआय : 02

* सीपीएम : 02

* एमआयएम : 01

* अपक्ष : 01

एकूण - 243

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT