Nitish Kumar, tejaswi Yadav sarkarnama
देश

बिहार लवकरच जेडीयूमुक्त, RJD-नितीश आघाडी तोडणार : भाजप नेत्याचा दावा

JDU News : बिहारमधील जेडीयू-आरजेडी युती तोडून राज्याला जेडीयूमुक्त करण्याचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

बिहार : मणिपूरमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला (JDU) भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा धक्का दिला आहे. जेडीयूचे सहापैकी पाच आमदार भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. यावर राज्यसभा खासदार आणि बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते सुशालकुमार मोदी यांनी म्हंटले आहे की, "अरुणाचल प्रदेश पाठोपाठ आता मणिपूरही जेडीयूमुक्त झाले आहे." "या सर्व आमदारांना एनडीएमध्ये राहायचे होते," असा दावाही त्यांनी केला. लवकरच आम्ही बिहारमधील जेडीयू-आरजेडी युती संपुष्टात आणून राज्याला जेडीयूमुक्त करू, असेही मोदी म्हणाले. नितीश कुमार यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, "होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावून कोणताही नेता पंतप्रधान बनू शकत नाही."

याआधीही सुशीलकुमार मोदी यांनी नितीश कुमार यांच्यावर ट्विट करत टीका केली होती. यानंतर जेडीयू नेत्यांकडून भाजपवर अधिकाधिक शाब्दिक हल्लाबोल करण्यात येत आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ​​लालन सिंह यांनी सुशील कुमार मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लालन सिंह यांनी मोदींना उद्देशून भाजपच्या नैतिकता आणि आचरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लालन सिंह यांनी लिहिले, “सुशील जी, तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की अरुणाचल आणि मणिपूर या दोन्ही ठिकाणी JD(U) ने भाजपचा पराभव करून जागा जिंकल्या. त्यामुळे जेडीयूपासून मुक्तीचे दिवास्वप्न पाहू नका. अरुणाचलमध्ये जे घडले ते तुम्ही युती धर्माचे पालन केल्यामुळे झाले. आणि मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजपचे नैतिक आचरण सर्वांसमोर आले आहे. तुम्हाला आठवत असेल की 2015 मध्ये पंतप्रधानांनी 42 सभा घेतल्या, तेव्हा फक्त 53 जागा जिंकता आल्या होत्या. 2024 मध्ये देश भाषणबाजीपासून मुक्त होईल, वाट पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT