Aditya Thackeray, Tejashvi yadav, Nitish Kumar Latest News
Aditya Thackeray, Tejashvi yadav, Nitish Kumar Latest News Sarkarnama
देश

आदित्य ठाकरेंच्या राजकारणाचा 'बिहारी पॅटर्न'! तेजस्वी यादवांनंतर नितीश कुमारांचीही भेट

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray : माजी मंत्री व युवासेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख आदित्य ठाकरेंचा बिहार दौऱ्याची चांगलीच चर्चा आहे.यावेळी त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली आहे. आता आदित्य ठाकरेंनी तेजस्वी यादवांसह मुख्यमंत्री नितीश कुमारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. (Aditya Thackeray, Tejashvi yadav, Nitish Kumar Latest News)

आदित्य ठाकरे हे बुधवारी (दि.२३ नोव्हेंबर) बिहारच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित आहेत.पाटणा विमानतळावर उतरल्यानंतर ठाकरेंचे जंगी स्वागत करण्यात आले होते.

स्वागतानंतर ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांची भेट घेतली.या भेटीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, जनता दलाचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत कायमच अनेक मुद्द्यांवर चर्चा होत असते.मात्र,आता हे सलोख्याचे संबंध आजच्या भेटीद्वारे आणखी दृढ झाले आहे.मात्र,या भेटीत ठाकरे आणि यादवांमध्ये विविध मुद्द्यांवर गुफ्तगू झाल्याची शक्यता आहे.

तेजस्वी यादवांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या भेटीसाठी रवाना झाले. त्यांनी नितीश कुमारांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील उपस्थित होते. या भेटीत मुंबई महापालिका निवडणूक तसेच भाजपविरोधी रणनीतीसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं.

आदित्य ठाकरेंच्या बिहार दौर्यामागचं कारण काय ?

राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई पालिका निवडणूक देखील भाजपकडून प्रतिष्टेची करण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.कारण मुंबईत उत्तर भारतीय मतांची संख्या प्रचंड आहे. या मतांच्या जुळवा जुळवीसाठी भाजपनं अगोदरपासून प्रयत्न सुरु केले आहेत.त्यामुळे शिवसेनेकडूनही या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येत आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT