Bipin Rawat
Bipin Rawat Sarkarnama
देश

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला याआधीही झाला होता अपघात

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी लष्कराचे MI17V5 हेलिकॅाप्टर कोसळले. भारतीय वायुसेनेच्या या हेलिकॉप्टरध्ये देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 लष्करी अधिकारी प्रवास करत होते. या अपघातात बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सीडीएस रावत यांचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०१५ मध्ये रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.

ही घटना ३ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. त्या वेळी रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले नव्हते. बिपिन रावत यांची २०१६ मध्ये सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस आहेत. रावत त्या वेळी नागालँडमधील दिमापूर येथील लष्कराच्या ३-कॉर्प्सच्या मुख्यालयाचे प्रमुख होते. बिपिन रावत यांनी त्यांच्या चित्ता हेलिकॉप्टरने दिमापूर सोडले होते. मात्र, काही उंचीवर त्यांचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर जमीनीवर कोसळले. या अपघातामागे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हेलिकॅाप्टर कोसळल्याचे सांगण्यात आले होते. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बिपिन रावत या अपघातातून बचावले होते. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली होती.

त्या वेळी लष्कराने आपल्या अधिकृत निवेदनात हेलिकॉप्टर जमिनीपासून काही मीटर उंचीवर उडाल्याचे सांगितले होते. या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरमध्ये काही गडबड झाली. दोन्ही वैमानिकांचे नियंत्रण सुटले. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या घटनेचीही हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशी केली, असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT