Viajay Shankar Das|
Viajay Shankar Das| 
देश

स्वत:चेच लग्न विसरले आमदार: वधु पोहचली थेट पोलिस ठाण्यात...

सरकारनामा ब्युरो

पारादीप : लग्न ठरल्यानंतर तरुण तरुणींमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो. हे लग्नाळू तरुण लग्नाची स्वप्ने रंगवत असतात. पण लग्नाचे वचन देऊन एक आमदार आपल्याच लग्नाला उपस्थित न राहिल्याची घटना समोर आली आहे. ओडिशातील बिजू जनता दलाचे (BJD) आमदार विजय शंकर दास (MLA Vijay Shankar Das) यांच्यावर शनिवारी स्वतःच्या लग्नाला उपस्थित न राहिल्याबद्दल नियोजित वधुने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (MLA Vijay Shankar Das latest news Odisha)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतसिंगपूर सदर पोलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून तिर्तोलचे आमदार विजय शंकर दास (३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आश्वासन देऊनही आमदार शुक्रवारी विवाह निबंधक कार्यालयात आले नाहीत, असा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी आरोपी आमदाराविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरनुसार, संबधित वधु आणि आमदाराने 17 मे रोजी विवाह निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. 30 दिवसांचा नियोजित कालावधी उलटल्यानंतर वधु आापल्या कुटुंबियांसह लग्नाच्या औपचारिकतेसाठी विवाह निबंधक कार्यालयात पोहोचली, मात्र आमदार विजय शंकर दास कार्यालयात पोहचलेच नाहीत.

बराच वेळ वाट पाहुनही आमदार विजय दास लग्नाला उपस्थित न राहिल्यामुळे वधुने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी' आपण वधुशी लग्न करण्यास नकार दिलाच नाही. अर्ज दाखल केल्यानंतर तीस दिवसांच्या कालावधी संपल्यानंतर ६० दिवसांच्या आत आपण लग्नाची नोंदणी करू शकतो. त्यामुळे विवाह नोंदणीसाठी अजून ६० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मी आलो नाही. पण मला त्यांनी किंवा इतर कोणीही विवाह निबंधकांच्या कार्यालयात जाण्याची सूचना दिली नाही,' असे स्पष्टीकरण आमदार दास यांनी दिले आहे.

दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून संंबंधित वधु आमदार दास यांच्यासोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, अशीही माहिती आहे. आमदार दास यांनी आपल्याला ठरलेल्या तारखेला लग्न करण्याचे वचन दिले होते. पण ते विवाह निबंधक कार्यालयात पोहचले नाहीत. दुर्दैवाने, त्याचा भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्य मला धमकावत आहेत. त्यात आमदार दास यांनी आपले वचन पाळले नाही आणि ते माझ्या फोन कॉलला उत्तर देत नसल्याचा आरोप वधुने महिलेचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT