BJD MP Sasmit Patra and BJP MP Nishikant Dubey amid controversy over remarks on Biju Patnaik. sarkarnama
देश

BJP News : दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये घमासान : बीजेडी खासदार पात्रांचा तडकाफडकी राजीनामा; निशिकांत दुबेंचे जाहीर वाभाडे

BJP News : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर बीजेडी खासदार सस्मित पात्रा यांनी संसदेच्या आयटी समिती सदस्यत्वाचा निषेधार्थ तात्काळ राजीनामा दिला.

Hrishikesh Nalagune

BJP News : बिजू जनता दलाचे राज्यसभा खासदार सस्मित पात्रा आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यामध्ये जोरदार घमासान सुरु आहे. निशिकांत दुबे यांचा जाहीरपणे निषेध करत पात्रा यांनी तडकाफकडी राजीनामा दिला आहे. आपण दुबे यांच्यासोबत कामच करू शकत नाही, म्हणत पात्रा यांनी राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्ण यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टवरून दोघांमधील वाद सुरु झाली. या पोस्टमध्ये दुबे यांनी दावा केला की, 1960 च्या दशकात नेहरू-गांधी कुटुंब अमेरिकेच्या प्रभावाखाली काम करत होते.

27 मार्च 1963 चा संदर्भ देत दुबे म्हणाले की, त्या दिवशी ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री बिजू पटनायक अमेरिकेला गेले होते. बिजू पटनायक यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावली होती.

इतकेच नव्हे तर, 1962 चे भारत-चीन युद्धही अमेरिकेच्या सांगण्यावरून लढले गेले आणि त्यासाठी अमेरिकन आर्थिक मदतीचा वापर झाला, असा गंभीर आरोप दुबे यांनी केला आहे. या आरोपांवर ओडिशातील विरोधी पक्ष बिजू जनता दलाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभा खासदार सस्मित पात्रा यांनी संताप व्यक्त करत निशिकांत दुबे यांच्या नेतृत्वातील आयटी व कम्युनिकेशनच्या स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, स्वातंत्र्यलढ्यात जीवन अर्पण केलेल्या एका महान नेत्याबद्दल खोटे आणि अपमानास्पद आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली काम करणे त्यांना मान्य नाही.

“बिजू पटनायक हे राष्ट्रीय नायक आहेत. त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे इतिहासाचा अपमान आहे,” असे सांगत पात्रा यांनी दुबे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांच्या मते, अशा प्रकारची वक्तव्ये केवळ राजकीय हेतूने केली जात असून ती लाखो लोकांच्या भावना दुखावणारी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT