BJP Sarkarnama
देश

Haryana BJP News : हरियाणात बंडखोरांविरोधात भाजपची कडक भूमिका ; आठ नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी!

Mayur Ratnaparkhe

BJP action against rebel leaders in Haryana : हरियाणा विधानसभा निवडणुकीआधी भाजपने आपल्या बंडखोर नेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधता निवडणूक लढणाऱ्या आठ बंडखोर नेत्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. या नेत्यांमध्ये संदीप गर्ग, रणजीत चौटाला, जिलेराम शर्मा, देवेंद्र कादयान, बच्चन सिंह आर्य यांच्या नावांचा समावेश आहे.

हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलला बडौली यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढत असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना तत्काळ प्रभावाने सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केले आहे. भाजपने(BJP) ज्यांना पक्षातून काढले आहे, त्यामध्ये ते नेते आहेत जे लाडवा, असंध, गन्नौर, सफीदो, रानिया, महम, गुरुग्राम आणि हथीन येथून पक्षाच्या उमदेवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

लाडवा येथून संदीप गर्ग, असंधमधून जिलेराम शर्मा, गन्नौरमधून देवेंद्र कादयान, सफीदो येथून बच्चन सिंह आर्य, रानिया येथून रणजीत चौटाला, महम येथून राधा अहलावत, गुरुग्राममधून नवीन गोयल आणि हथीन मधून केहरसिंह रावत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या सर्वांना भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केले आहे. यामध्ये रणजीत चौटाला यांचे नाव चर्चेत आहे. रणजीत चौटाला कॅबिनेटमंत्री राहिले आहेत, ते आता रानिया येथून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते. रणजीत चौटाला हे माजी मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांचे पुत्र आहेत.

लाडवा येथून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी निवडणूक लढवत आहेत. असंध येथून योगेंद्र राणा, गन्नौर येथून देवेंद्र कौशिक, सफींदोमधून रामकुमार गौतम, रानिया येथून शीशपाल कंबोज, महम येथून दीपक निवास हुड्डा, गुरुग्राममधून मुकेश शर्मा आण हथीन येथून मनोज रावत हे भाजपच्या तिकाटीवार निवडणूक लढवत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT