Amit Shah Karnataka Sarkarnama
देश

Amit Shah Karnataka : अमित शाह कर्नाटकात; जारकीहोळींवरील ED कारवाईनंतर चिक्कोडी दौऱ्याकडे लक्ष

Amit Shah Karnataka visit puts Chikkodi in focus amid the ED probe involving Satish Jarkiholi : हुबळीतील कार्यक्रमानंतर अमित शाह एकसंबा येथे जाणार; जारकीहोळी-जोल्ले समीकरणाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या राजकारणात चर्चेला उधाण

Pradeep Pendhare

Amit Shah Karnataka Today : काँग्रेसचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बालेकिल्ल्यात भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह अन् डी. के. शिवकुमार दोघेही सत्ताधारी असल्याने, कर्नाटकमध्ये आमने-सामने येत असल्याचे देशाचे, कर्नाटकमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

कर्नाटक राज्यात काँग्रेस अन् भाजपमध्ये संघर्ष वाढला आहे. केंद्रातील भाजप सत्ताधाऱ्यांचा कर्नाटकमध्ये वाढलेल्या हस्तक्षेपामुळे काँग्रेस देखील आक्रमक आहे. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसमधील सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावरील सक्तवसुली संचालनालयाची कारवाई झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व झाले आहे.

अमित शाह (Amit Shah) काल शुक्रवारी रात्री उशिरा हुबळी येथे दाखल झाले. एका खासगी हॉटेलमध्ये ते मुक्कामाला आहे. तिथे कर्नाटक राज्यातील भाजप नेत्यांबरोबर काही महत्त्वाच्या मुद्यावर बैठक घेतली. आज सकाळी हुबळीच्या बाहेरील गब्बूर बायपास येथे केएलई संस्थेच्या 1500 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे आणि नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्‍घाटन Pens.

आज सायंकाळी ते बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा गावाला भेट देणार आहेत. भाजप (BJP) आमदार शशिकला जोले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या ‘श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या नव्या इमारतीचे उद्‍घाटन करणार आहेत.

अमित शाह येत असल्याने संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जारकीहोळी बंधू आणि जोल्ले कुटुंबाने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. जारकीहोळी बंधूंच्या पाठिंब्यामुळेच अण्णासाहेब जोल्ले बँकेचे अध्यक्ष झाले आहेत.

जारकीहोळी यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईनंतर अमित शाह यांचा चिक्कोडी दौरा लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख नेते हुबळीत दाखल तळ ठोकून आहेत. या दौऱ्यात भाजपच्या राज्यातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काय राजकीय घडामोडी होणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT