पश्चिम बंगालमधील राजकारण पुन्हा एकदा तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराची गंभीर घटना समोर आली आहे. परगना परिसरात भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर अचानक हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेत ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकांकडील शस्त्रे हिसकावण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडत असताना ही घटना घडल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून या निवडणुकीत जोरदार मोहीम राबवली जात आहे, तर भाजपनेही पूर्ण ताकद लावली आहे. अशा संवेदनशील वातावरणात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
भाजपचे उमेदवार विकास सरदार यांनी या हल्ल्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी विरोधकांकडून दबाव टाकला जात आहे.
सुमारे 200 ते 250 कार्यकर्त्यांनी रॉड आणि बांबू घेऊन त्यांच्या वाहनांवर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून चालकावरही मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.