चंडीगड : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) चंडीगड महापालिका (Chandigarh Municipal Corporation) निवडणुकीत मुसंडी मारत सर्वाधिक जागा पटकावल्या होत्या. मागील वेळी सत्तेत असलेल्या भाजपला (BJP) आपने दुसऱ्या क्रमांकावर फेकले होते. आता दुसऱ्या क्रमांकावर असूनही भाजपने आपला धक्का देत महापौरपद (Mayor) मिळवले आहे.
भाजपच्या सरबजीतकौर या महापौर झाल्या आहेत. त्यांना २८ पैकी १४ नगरसेवकांची मते मिळाली. या निवडणुकीवेळी आपचे नगरसेवक गोंधळ करताना दिसून आले. आपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला १३ मते मिळाली. एक मत अवैध ठरवण्यात आल्याने भाजपचा उमेदवार केवळ एका मताने जिंकला. भाजपने या निवडणुकीत काळाबाजार केल्याचा आरोप आपने केला आहे. आपच्या नगरसेवकांचा गोंधळ वाढू लागल्यानंतर अखेर पोलिसांना बोलवावे लागले.
पंजाब (Punjab) आणि हरियाना (Haryana) या राज्यांची राजधानी असलेल्या चंडीगडमधील (Chandigarh) महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. चंडीगड महापालिकेतील (Chandigad Municipal Corporation) 35 पैकी 14 जागा आपने (AAP) जिंकल्या. भाजप (BJP) 12 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. काँग्रेस (Congress) 8 जागा मिळवत तिसरा स्थानी आहे. अकाली दलाला (Akali Dal) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. भाजपचे आधी महापौर असलेले रविकांत शर्मा आपच्या उमेदवारांकडून पराभूत झाले होते. आपलाही या निवडणुकीत एक धक्का बसला असून, प्रचार प्रमुख चंदरमुखी शर्मा पराभूत झाले होते.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या अकाली दलाला एक जागा मिळाली होती. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपसोबतची आघाडी तोडली होती. काँग्रेसला मागील निवडणुकीत 4 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने आता आपल्या जागा दुपटीने वाढवल्या आहेत.
चंडीगडमध्ये दर पाच वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दरवेळी दिसून येते. या वेळी मात्र अपवाद झाला असून, आपने मुसंडी मारली आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आलेल्या असताना आपने आपली ताकद दाखवून दिली आहे. यामुळे भाजपसह काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत आप, भाजप, काँग्रेस, अकाली दल - बहुजन समाज पक्ष आघाडी अशी चौरंगी लढत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.