Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
देश

Pune News : उद्धव ठाकरेंना करायला लावलं जी रे जी..! ; बावनकुळेंकडून नितेश राणेंचं कौतुक..

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule Appreciated mla Nitesh Rane : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या दररोज होणाऱ्या पत्रकार परिषदेला रोखण्यासाठी भाजपने आमदार नितेश राणे यांना पुढे केले आहे. गेल्या काही दिवसापासून राऊत-राणे यांच्या पत्रकार परिषदेमुळे राज्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

राऊतांच्या आरोपांना राणे सडेतोडपणे प्रत्युत्तर देत आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणेंचं कौतुक केलं आहे.

भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे कालपासून (बुधवार) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. आज (गुरुवार) त्यांच्या उपस्थितीत पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठक होत आहे. या बैठकीत बावनकुळे यांनी राणेंचं तोंडभरुन कौतुक केलं.

"नितेश राणे यांनी रोज सकाळी सुरू असलेला संजय राऊत यांचा भोंगा आवरण्याचा चांगला प्रयत्न सुरू ठेवला आहे. ते केवळ संजय राऊतांच्या आरोपांना तोडीस तोड उत्तरच देत नाहीत तर अत्यंत अभ्यासूपणे मुद्दा मांडण्याचे काम करीत आहेत," या शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणे यांचे कौतुक केलं.

"या पुढच्या काळातही राणे हे काम अत्यंत तडफदारपणे पार पाडतील,"असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. नागपुरच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात 'अरे- तुरे' असा केला होता, मात्र राणे यांनी तो मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित करत ठाकरे यांना योग्य भाषेत उत्तर दिलं.

त्याचा परिणाम म्हणून ठाकरेंना मुंबईच्या सभेत मोदी यांचा उल्लेख "मोदीजी, 'मोदीजी," असाच करावा लागला, हे राणे याचं यश असल्याची आठवण बावनकुळे यांनी सांगितली.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT