Gujarat municipal election results Sarkarnama
देश

Gujarat Local Body Elections: दिल्लीनंतर भाजपनं काँग्रेसला या राज्यात लोळवलं; 15 नगरपालिकांवर वर्चस्व

Gujarat municipal election results: आपने गुजरातमध्ये तब्बल दोन डझन जागा पटकावल्या आहेत. व्दारकामध्ये आपने चांगला विजय मिळवला आहे.

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसला धोबीपछाड दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमटाऊन असलेल्या गुजरातमधील नगरपालिका निवडणुकीत भाजपने विजयी घौडदोड केली आहे. पण दिल्ली गमावल्यानंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

आपने गुजरातमध्ये तब्बल दोन डझन जागा पटकावल्या आहेत. व्दारकामध्ये आपने चांगला विजय मिळवला आहे. जुनागढमधील मांगरोल नगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये आपने बाजी मारली आहे. करजण नगरपालिकेतील पाच जागा आपने जिंकल्या आहेत.

वडोदरा जिल्ह्यात आपने आपला दबदबा कायम ठेवला आहे. येथे 4 जागांवर आपने विजय मिळवला आहे. जामनगर येथील जामजोधपूर नगरपालिकेत आपने एन्ट्री केली आहे. जामनगर येथे 28 जागापैकी 27 जागा भाजपनं जिंकल्या आहेत. येथील एक जागा आपने पटकावली आहे.

जूनागढ महानगरपालिकेच्या 68 पैकी 60 जागा भाजपने पटकावल्या आहेत. तीन पंचायत समित्यांवर भाजपने आपल्या झेंडा फडकावला आहे. काँग्रेसच्या ताब्यातील 15 नगरपालिका भाजपने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. काँग्रेसने एका नगरपालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. समाजवादी पार्टीने दोन नगरपालिकावर वर्चस्व मिळवले आहे.

भाजपने 60 नगरपालिका आणि तीन पंचायत समित्या जिंकल्या आहेत.काँग्रेसने देवभूमि व्दारका जिल्ह्यातील सलाया नगरपालिका ताब्यात घेतली आहे. विरोधी पक्षानी मुस्लिम बहुल नगरपालिकेने 28 पैकी 15 जागा पटकावल्या आहे. आम आदमी पार्टीने 13 जागा पटकावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT