Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda
Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda sarkarnama
देश

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली; पक्ष नेतृत्वाची उत्तर प्रदेशसाठी चार तास बैठक

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीच्या तयारीसंदर्भात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संघटनात्मक दृष्टिकोनातून तयारीसंदर्भात सोमवारी राज्याच्या निवडणूक संघासोबत चर्चा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) देखील बैठकीला उपस्थित होते. ही बैठक तब्बल चार तास चाली. या बैठकीत, पुढील १०० दिवसांसाठी कार्यक्रम तयार करण्याबरोबरच, सकारात्मकतेने ते जनतेपर्यंत पोहचण्यास सांगितले आहे. लखीमपूर खिरी घटना व त्याच्या परिणामांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी संघटनात्मक तयारीसाठी ही ही बैठक बोलवली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल यांच्यासह निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, संस्थेचे प्रभारी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष राधा मोहन सिंग उपस्थित होते.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीत, पुढील १०० दिवसांसाठी ब्लू प्रिंट तयार करणे, प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमुख तैनात करणे, सामाजिक परिषदा आयोजित करणे व केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी कार्यक्रम चालवण्याचे सांगितले गेले, असल्याची माहिती आहे. पक्षाच्या विद्यमान व भविष्यातील मित्रपक्षांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. आघाडीची स्थिती आणि पक्षाची रणनीती वेळेआधीच अंमलात आणली जाईल. शेवटच्या क्षणी उमेदवारीबाबत फार गोंधळ होऊ नये, यासाठी ही चर्चा झाली.

जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे पक्षाकडे आता फक्त १०० दिवस शिल्लक आहेत. ज्यामध्ये भाजप पुन्हा निवडणुका जिंकण्याची तयारी करत आहे. आतापासून काम सुरू केल्यास भाजपला जानेवारीच्या मध्यापर्यंत १०० दिवसांचा वेळ मिळणार आहे. उत्तर प्रदेशात विविध जाहीर सभा घेण्याचे आणि बूथ स्तरावर आपली उपस्थिती वाढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. ४०३ विधानसभा मतदारसंघांसाठी पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात ३१२ जागा जिंकून सत्तेवर आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT