Subramanian Swamy and Narendra Modi
Subramanian Swamy and Narendra Modi 
देश

मोदींच्या विरोधात बोलणं पडलं महागात; ज्येष्ठ नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : नवी दिल्ली : भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. मोदी हे भारताचे राजे नाहीत, अशी टीका त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. ही टीका त्यांना भोवली असून, त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

भाजपने गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमधून स्वामींना वगळण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून स्वामी हे आपल्याच सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. तसेच, वरूण गांधी आणि त्यांच्या मातोश्री खासदार मेनका गांधी यांनाही कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आलेला आहे. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे. याचवेळी शेतकरी आंदोलनावरून सरकार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदरसिंह यांनाही वगळलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्वामींना स्थान देण्यात आले नाही, याबाबत एका व्यक्तीने स्वामी यांनी ट्विटरवर छेडले होते. तुम्हाला मंत्रिपद न मिळाल्याने तुम्ही भाजप सरकारवर टीका करीत आहात, असा आरोप त्या व्यक्तीने केला होता. यावर स्वामी यांनी उत्तर देताना थेट मोदींवर निशाणा साधला होते. त्यांनी म्हटले होते की, मी मोदीविरोधी आहे. माझा मोदींच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांना विरोध आहे. यासंबंधी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींशी समोरासमोर चर्चा करण्यासही मी तयारी आहे. तुम्ही सहभागाच्या तत्वावर चालणारी लोकशाही ऐकली आहे का? मोदी हे काय भारताचे राजे नाहीत.

काही दिवसांपूर्वी स्वामी यांनी भाजपच्या आयटी सेलला लक्ष्य केले होते. भाजपच्या आयटी सेलवरून सोशल मीडियावर अक्षरशः घाण पसरवली जात आहे. अमित मालवीय यांच्या अध्यक्षतेखालील हा सारा विभाग बदमाश तसेच धूर्त बनल्याची टीका स्वामी यांनी केली होती. स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मालवीय यांना त्वरित पदावरून हटवा, अशी मागणी केली होती. स्वामी यांनी भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनाच निशाण्यावर घेतले आहे. मात्र, अमीत मालवीय यांनी स्वामी यांना थेट प्रत्युत्तर दिलेले नाही.

राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 80 नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे. पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT