Women Reservation Bill Sarkarnama
देश

Modi On Women Reservation Bill: 'तीन दशकांनंतर भाजपने कटिबद्धता पूर्ण केली'; 'महिला आरक्षणा'साठी मोदींच्या शुभेच्छा...

Narendra Modi On Women Reservation Bill : "महिलांचं जीवनमान सुधारण्यासाठी जी ग्वाही मोदीने दिली होती, हे त्याचंच प्रमाण आहे."

Chetan Zadpe

Delhi News : ऐतिहासिक असे महिला आरक्षण विधेयक लोकसभेसोबतच राज्यसभेतही मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं आज सकाळी राजधानी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये पक्षाच्या महिला आघाडीकडून भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी मोदींनी आपल्या भावना व्यक्त करतानाच देशातील कोटी कोटी महिलांचं अभिनंदन केलं आहे. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

नरेंद्र मोदी म्हणाले, "काही निर्णयामध्ये देशाचं भाग्य बदलण्याची ताकद असते. नारी शक्ती वंदन अधिनियम या निर्णयाचं आपण साक्षीदार बनलो आहोत. महिला आरक्षण विधेयक विक्रमी मतांनी संमत केलं गेलं. महिलांचं स्वप्न पूर्ण झालं. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आज प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास अनोख्या उंचीवर आहे. देशातील महिला, माता, भगिनी आम्हाला आशीर्वाद देत आहेत. कोटी कोटी महिलांचं स्वप्नं पूर्ण करण्याचं भाग्य आमच्या भाजप सरकारला मिळालं आहे,"

"नारी शक्ती वंदन अधिनियम ही सामान्य गोष्ट नाही. ही नव्या भारताच्या, नव्या लोकशाहीची नांदी आहे. महिलांचं जीवनमान सुधारण्यासाठी जी ग्वाही मोदीने दिली होती, हे त्याचंच प्रमाण आहे. मी देशातल्या महिलांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. महिलांची प्रगती व्हावी म्हणून या कायद्यासाठी भाजपने तीन दशकांपासून प्रयत्न केले होते. ही आमची कटिबद्धता होती. आज आम्ही ही गोष्ट पूर्ण केली आहे," असेही मोदी म्हणाले.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT