Navya Haridas Vs Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Navya Haridas Vs Priyanka Gandhi : भाजपने वायनाडमध्ये प्रियांका गांधींविरोधात नाव्या हरिदास यांना दिली उमेदवारी!

Wayanad by-election for the Lok Sabha News : जाणून घ्या, नाव्या हरिदास नेमक्या आहेत तरी कोण? ; झारखंड विधानसभा निवडणुकीसह अन्य राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही उमेदवार केले जाहीर

Mayur Ratnaparkhe

BJP Wayanad candidate Navya Haridas News : भाजपने केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रियंका गांधींविरोधात नाव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. तसेच झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी 66 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.

याशिवाय भाजपने(BJP) आज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आसामच्या तीन जागांवर, बिहारच्या सात, छत्तीसगडमधील एक, कर्नाटकातील दोन जागा, केरळातील दोन जागा, मध्य प्रदेशातील दोन जागा, राजस्थानातील सहा जागा आणि पश्चिम बंगालमधील सहा जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.

दक्षिण केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रियंका गांधी-वाड्रा(Priyanka Gandhi) यांच्याविरोधात भाजपने नाव्या हरिदास यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. भाजपने केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसह झारखंड विधानसभा निवडणूक आणि आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अधिकृतरित्या जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव्या हरिदास यांचे नाव आहे.

नाव्या हरिदास या सध्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. तसेच भाजपने या आधी नाव्या हरिदास यांना 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत संधी दिली होती. त्यांनी कोझिकोड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि निकालानंतर त्या तिसऱ्या स्थानावर होत्या. याशिवाय नाव्या हरिदास कोझिकोड मधून नगरसेवकही राहिलेल्या आहेत.

नाव्या हरिसदास यांनी 2007मध्ये कालिकत विद्यापीठाच्या केएमसीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. सध्या त्यांचे वय 39 आहे. वर्ष 2021मध्ये कोझोकड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नाव्या यांना 24,873 मतं मिळाली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT