Vinod Tawde Chandigarh News : भारतीय जनता पक्षाने चंदीगड महापालिकेवर पुन्हा एकदा झेंडा फडकावला आहे. भाजपने चंदीगड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. भाजपचे (BJP) उमेदवार अनुप गुप्ता यांनी आपचे उमेदवार जसबीर सिंह यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. गुप्ता यांच्या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदाची निवडणुकही भाजपने जिंकली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या खेळीमुळे पुन्हा एकदा चंदीगडमध्ये भाजपचे कमळ फुलले. मागील निवडणुकीत देखील तावडे यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. चंदीगडमध्ये महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या ३६ आहे.
त्यामध्ये आपकडे १४ आणि भाजपकडे १४ तर काँग्रेसकडे (Congress) ६ व शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. मात्र, काँग्रेस व अकाली दलाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यांनी मतदान न केल्याने भाजपला मोठा फायदा झाला. भाजपच्या १४ व आपच्या १४ नगरसेवकांनी मतदान केले. यानंतर महापालिकेच्या नियमानुसार चंदीगडच्या खासदारांनीही मतदान केले. त्याच्या आधारे भाजपचे गुप्ता विजयी झाले.
महापौर पदाच्या निवडणुकीत एकूण २९ जणांनी मतदान केले. त्यातील १५ मते भाजपला तर १४ मते आपला मिळाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भाजप खासदारांच्या मतदानावर आक्षेप न घेतल्याने गुप्ता यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. चंदीगड महापालिकेवर भाजपची सत्ता असून महापौर पदाच्या निवडणुकीत सलग आठव्यांदा त्यांनी बाजी मारली आहे.
काँग्रेस व अकाली दलाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचा भाजपला फायदाच मिळला. दरम्यान, वरिष्ठ उपमहापौर पदावर कवंर राणा व उपमहापौर पदावर हरजीत सिंह हे विजयी झाले. तावडे यांनी या विजयाबद्दल महापौर, वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर पदावर निवड झालेल्या नेत्यांचे ट्वीट करत अभिनंदन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.