Hardeep Sing Congerss Hardeep Sing Congerss
देश

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; कॅबिनेट मंत्री हरदीपसिंग पुरींसह आणखी एका मंत्र्याचा पत्ता कट

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत रिक्त होणाऱ्या ८ जागांसाठी भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या यादीत केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचं नाव नसल्यानं याची चर्चा सुरु आहे.

Amit Ujagare

Rajya Sabha Election: उत्तर प्रदेशच्या १० राज्यसभेच्या जागांपैकी ८ जागांसाठी भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या यादीत केंद्रीय कॅबिनेट मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांचा या यादीत समावेश नाही. त्यामुळं या दोघांना मंत्रीपदाचे राजीनामे द्यावे लागण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळाली संधी?

भाजपनं आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्णा पाण्डेय, प्रियांका सिंह रावत, राम प्रताप सिंह चौहान, श्रुती गंगवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कॅबिनेट मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्यासह इतर ६ जणांची राज्यसभा खासदारकीची टर्म संपणार आहे. पण या यादीत पुरी आणि वर्मा यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. याचाच अर्थ हरदिपसिंग पुरी यांचा पत्ता भाजपनं कट केला असून सध्याचं मंत्रीपदंही त्यामुळं त्यांना सोडवं लागणार आहे.

भाजपची सोशल इंजिनीअर

दरम्यान, भाजपच्या या यादीमध्ये ८ पैकी २ उमेदवार हे ब्राह्मण समाजाचे, १ राजपूत, ३ ओबीसी आणि ३ दलित समुदयाला यामध्ये संधी देण्यात आली आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील १० जागांपैकी ८ जागा भाजपकडं आहेत. तर एक समाजवादी आणि एक जागा बहुजन समाज पार्टीकडं आहे.

कसं आहे बलाबल?

सध्या भाजपप्रणित एनडीएकडं राज्यसभेच्या २४५ पैकी १५० जागा आहेत. तर एनडीएत सहभागी नसलेल्या पक्षांकडं १०० जागा आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत सध्या ४०३ पैकी ३९६ जागांवर आमदार आहेत. तर उर्वरित ७ आमदारांचा गेल्या ११ महिन्यांमध्ये आजारपणांमुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यसभेच्या प्रत्येक उमेदवाला विजयासाठी पहिल्या पसंतीची ३७ मतं आवश्यक आहेत. १६ ऑक्टोबरला भाजप आणि समाजवादी पार्टीत तगडी फाईट असणार आहे. कारण भाजपकडं आणि सपाकडं अनुक्रमे ७ आणि २ जागा जिंकण्याऐवढी मत आहेत.

एनडीएचं बलाबल पाहिल्यास भाजपकडं स्वतःची २५५ मतं आहेत. तर एनडीएतील घटकपक्षांची एकूण मतं ३३ आहेत. यामध्ये अपना दल (एस) १३, आरएलडी ९, एबीएसपी ६, निशाद पार्टी ५ इतक्या जागा आहेत. या मिळून २८८ होतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT