Jayant Sinha  Sarkarnama
देश

Jayant Sinha News : जयंत सिन्हांनी भाजपलाच पाडलं तोंडावर; खरमरीत पत्रातून दिलं सडेतोड उत्तर

Rajanand More

New Delhi Politics : भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha News) यांनी आपल्याच पक्षाला तोंडावर पाडलं आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला नाही, मतदानही केलं नाही, असा ठपका ठेवत पक्षाने सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. जयंत सिन्हांचे पुत्र आशिष सिन्हा यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) प्रचार सभेत हजेरी लावल्याचे समोर आल्यानंतर लगेचच ही नोटीस बजावण्यात आली होती. त्याला नोटिशीला सिन्हा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

जयंत सिन्हा (Jayant Sinha Political News) हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, ते यावेळी रिंगणात नाहीत. आशिष सिन्हा यांनी 15 मेला या मतदारसंघात इंडिया आघाडीच्या प्रचार सभेत हजेरी लावून उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यानंतर झारखंड प्रदेश भाजपने (BJP) जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने त्यात आणखीच भर पडली.(Latest Marathi News)

जयंत सिन्हा यांनी नोटिशीला उत्तर देताना कारणे दाखवा नोटीस पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहेत. आपण मतदान (Voting) केलं नाही, हा दावा चुकीचा असून टपालाद्वारे मतदान केल्याने सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. नियोजित कामांमुळे परदेशात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Latest Lok Sabha Election News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी मार्चमध्ये निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर पक्षातील एकही आमदार, खासदार किंवा वरिष्ठ नेत्यांकडून माझ्याशी संपर्क साधला नाही. मी निवडणुकीच्या कामांत सक्रीय होणे पक्षाला अपेक्षित होते, तर किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. पक्षाच्या कोणत्या कार्यक्रमांमध्ये, सभांसाठी किंवा संघटनेच्या बैठकांसाठी मला निमंत्रित केले नाही, अशी नाराजी सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.

भाजपने हजारीबाग मतदारसंघातून मनिष जैसवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्याआधीच सिन्हा यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. याबाबत त्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही कल्पना दिली होती, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने मला कोणत्याही कार्यक्रमासाठी निमंत्रित केले नाही, त्यामुळे मतदारसंघात थांबण्याचे कारण नव्हते, म्हणून नियोजन कामामुळे परदेशात गेल्याचा दावा सिन्हा यांनी केला आहे. मात्र, आर्थिक आणि प्रशासकीय मुद्यांवर पक्षामार्फत काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT