BJP Leader’s Son in Exploitation Case Sarkarnama
देश

Crime News : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल समोर; 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; पोलिसांची मोठी कारवाई!

BJP leader son sex scandal India: भाजप नेत्याच्या मुलावर 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

Rashmi Mane

Sexual Exploitation Case: महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच आता गोव्यातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका भाजपच्या स्थानिक राजकीय नगरसेवकांच्या मुलावर अनेक अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.

या प्रकरणात आरोपी असलेल्या सोहम नाईक याने गेल्या 3 वर्षांपासून 25 ते 30 अल्पवयीन मुलींशी संपर्क ठेवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. तो मुलींना फसवून त्यांच्यासोबतचे खासगी क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. नंतर हे व्हिडिओ वापरून त्यांना धमकावणे आणि गप्प बसण्यास भाग पाडणे असे प्रकार तो करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे अनेक मुली मानसिक तणावाखाली होत्या, अशीही माहिती पुढे येत आहे.

हे प्रकरण उघडकीस येण्यामागे एक वेगळीच घटना कारणीभूत ठरली. काही दिवसांपूर्वी एका पार्टीदरम्यान आरोपीने आपल्या मित्रांना हे व्हिडिओ दाखवले आणि स्वतःच्या कृत्यांबद्दल बोलल्याची चर्चा आहे. त्यानंतर ही माहिती बाहेर पसरली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काही नागरिकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला. दरम्यान, नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमाव करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

वाढत्या दबावामुळे पोलिसांनी रविवारी रात्री सोहम नाईक याला अटक असून पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. तसेच पीडित मुलींची ओळख सुरक्षित ठेवण्यावरही विशेष भर दिला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT