Tajinder Pal Singh Bagga latest news Update
Tajinder Pal Singh Bagga latest news Update Sarkarnama
देश

नाट्यमय घडामोडीनंतर भाजप नेत्याला दिलासा; HC न्यायाधीशांच्या घरात मध्यरात्री सुनावणी

सरकारनामा ब्युरो

Tajinder Bagga arrest case:

मोहाली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांच्या अटकेवरुन शनिवार-रविवारी रात्री पुन्हा एकदा मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. या सर्व घडामोडींनंतर अखेरीस रविवारी मध्यरात्री बग्गा यांना पंजाब - हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab An Hariyana High court) अटकेपासून दिलासा दिला असून १० मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे आणि कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पंजाब पोलिसांना दिले आहेत.

मोहाली सत्र न्यायालयाने शनिवारी संध्याकाळी बग्गा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. या अटक वॉरंटला त्यांनी तातडीने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर शनिवारी रात्री उशिरा उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती अनुप चितकारा यांनी त्यांच्या घरी सुनावणीला परवानगी दिली. त्यानंतर रविवारी मध्यरात्री ४५ मिनीटं सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने बग्गा यांना १० मे पर्यंत अटकेपासून दिलासा दिला. १० मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते डॉ. सनी सिंह यांनी १ एप्रिल रोजी बग्गा यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यावर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बग्गा यांनी 'द कश्मिर फाईल्स ' चित्रपटाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली होती. बग्गा यांनी केजरीवाल यांना ते कश्मिरी पंडितांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. त्यावरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर पंजाब पोलिस बग्गा यांना अटक करण्यासाठी गेले होते.

मात्र या अटकेवरुन मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांच्या अटकेवरुन तीन राज्यांचे पोलिस कामाला लागले होते. त्यांना पंजाबला घेऊन जात असतानाच हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना कुरुक्षेत्रमध्ये अडवले होते. त्यानंतर त्यांनी तेजिंदर यांची सुटका करून त्यांना दिल्ली पोलिसांसोबत दिल्लीकडे पाठवले. या दरम्यान बग्गा यांच्या वडीलांच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT