Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

BJP Politics : ते संसदेत शो चालवितात! भाजप खासदारांमधील निवडणुकीतील वादाने गाठले टोक

BJP internal conflict comes to light : दिल्लीतील प्रतिष्ठित कॉन्स्टिट्युशनल क्लबच्या सचिव पदाच्या निवडणुकीत राजीव प्रताप रुडी हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात निशिकांत दुबे यांनी उमेदवार दिल्याचा आरोप त्यांनी केला.

Rajanand More

Impact of BJP leaders’ clash on party politics : भाजपमधील दोन नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री खासदार राजीव प्रताप रूडी यांनी पक्षातीलच खासदार निशिकांत दुबे यांच्याबाबत खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाबाबत चर्चांना उधाण आले आहे. रुडी यांनी दुबेंना अहंकारी म्हटले असून गंभीर आरोपही केले आहेत.

दिल्लीतील प्रतिष्ठित कॉन्स्टिट्युशनल क्लबच्या सचिव पदाच्या निवडणुकीत रुडी हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात भाजपमधीलच खासदार होते. दुबेंनी त्यांना पाठिंबा दिला होता. यापार्श्वभूमीवर रुडी यांनी एका मुलाखतीदरम्यान दुबेंवर जोरदार हल्ला चढवला. दुबे हे ससदेत स्वत: सरकारपासून वेगळे सरकार चालविण्याचा दिखावा करतात. मी त्या सरकारचा हिस्सा नाही, असे रुडी म्हणाले.

पक्ष आणि संसदेतील प्रत्येक घडामोड त्यांच्याच अवतीभवती फिरते, असे दुबेंना वाटते. ते संसदेत शो चालवितात. त्यांनी वेगळे सरकार बनवले आहे. दिल्ली कॉन्स्टिट्युशनल क्लबच्या निवडणुकीत माझ्याविरोधात दुबे सक्रीय होते. माझा पराभव व्हावा, असे दुबेंना वाटत होते, असा दावा रुडी यांनी केला आहे. रुडी यांच्या या दाव्यामुळे भाजपमध्ये नेत्यांमधील विसंवाद आणि वाद टोकाला गेल्याचे दिसते.

आपल्याला पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचेही रुडी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपल्यासोबत होते. त्यांनी पाठिंबा दिला. पण त्यानंतरही दुबे यांनी माझ्याविरोधात उमेदवार उभा केला. वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण राजकारणामागे दुबेंचा हात असावा, असे संकेतही रुडी यांनी दिले.

दरम्यान, रुडी हे बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. तर दुबे हे झारखंडमधील आहेत. मात्र, या दोघांमधील वादाचा फटका बिहारसह झारखंड भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप हा शिस्तबध्द पक्ष मानला जातो. विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष मानला जातो. पण रुडी आणि दुबे यांच्यातील वैयक्तिक वाद आता पक्षीय पातळीवर गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT