भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा (BJP Manifesto)आज जाहीर केला. 'युवक, महिला, शेतकरी, गरीबी' यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.
मोदी म्हणाले, "आम्ही गुणवत्तेवर भर दिला आहे. आमच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेवर भर देण्यात आला आहे. विकसीत भारतासाठीचे हे संकल्पपत्र आहे,"
मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार
गरीबांचे कल्याण करणाऱ्या योजनांचा विस्तार करणार
पाईपमार्फत स्वस्त गॅस घरोघरी पोहचविणार
तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनविणार
तृतीय पंथियांना आयुष्यमान भारत योजनेत आणणार
रोजगार, उद्योजकतेवर भर देणार
कोट्यवधी लोकांचे वीजबील शुन्य करण्यासाठी काम करणार
समाजातील प्रत्येक घटकाला सशक्त बनविणार
शेतकरी, पशुमालक, मासेमारी करणाऱ्यांना सशक्त बनविणार
आयुष्यमान भारत योजनेत 5 लाखांपर्यंत विमा मिळणार
ज्यांना कुणी विचारत नाही, त्यांची आम्ही पूजा करतो.
तमिळ भाषाला वैश्विक भाषा करण्यासाठी प्रयत्न करणार
७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणणार
प्रत्येकाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे.
गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे.
आमचं सरकार गरीबांसाठी समर्पित सरकार आहे, आम्ही देशाच्या विकासाचा रोडमॅप समोर ठेवला आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाचा, गावाचा विकास झाला आहे. राम मंदीरासाठी मोदींचे मोठे योगदान आहे. महिला सशक्तीकरणासाठी भाजप सरकारने काम केले, असे जे.पी नड्डा यांनी सांगितले. जाहीरनाम्याला भाजपने संकल्पपत्र म्हटले आहे. जाहीरनामा समितीचे सर्व २७ सदस्य उपस्थित होते.
युवक, महिला, शेतकरी आणि गरीब अशा चारच जाती असल्याचे असे पंतप्रधान मोदी वारंवार सांगत आहेत. हे लक्षात घेता समाजातील या चार घटकांच्या उत्थानासाठी अनेक उपाययोजनांचा समावेश जाहीरनाम्यात आहे. नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान देण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. भाजप आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींचे संकल्प पूर्ण करण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे, असे नड्डा म्हणाले.
"आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो. केवळ भाजपचे लोकच नव्हे, तर भारतातील जनताही यावर विश्वास ठेवत आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. भाजपचे जे संकल्पपत्र अत्यंत सखोल संशोधन करून आणि सूचनांची अंमलबजावणी करून तयार करण्यात आले आहे. मोदींची हमी २४ कॅरेट सोन्याइतकीच खरी आहे," असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. 19 आणि 26 एप्रिल, 7, 13, 20, 25 मे आणि 1 जून या सात टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.