BJP karnataka : कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसने १३५ जागा पटकावून सत्ता स्थापन केली, तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावं लागलं.
निवडणुकीच्या प्रदीर्घ काळानंतर भाजपची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विरोधीपक्ष नेता कोण होणार, यावर चर्चा झाली. निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच विरोधीपक्षाची निवड करण्यात येते, कर्नाटक भाजपमधील अंतर्गत वादामुळे या निवडीला विलंब लागत आहे.
विधानसभेच्या निकालानंतर खूप दिवसांनी विरोधी पक्ष नेमण्यासाठी भाजपनं शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण या बैठकीत काही नावांची चर्चा झाली, पण निर्णय झाला नाही.
भाजपाप्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतील, कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह आणि केंद्रीय संसदीय बोर्डच्या सदस्य बीएस येदियुरप्पासह अनेक नेते उपस्थित होते.
विरोधीपक्षनेत्यासाठी अनेक नावावर पक्षश्रेष्ठी विचार करीत आहेत. यात बसवराज बोम्मई, बसनगौडा पाटील यतनाल, अश्लनारायण, वी सुनील कुमार आणि आर अशोक, श्रीनिवास पुजारी, तेजस्विनी गौडा, चालुवादी नारायण स्वामी यांच्या नावाची चर्चा आहे.
कर्नाटक भाजपमधील ११ नेत्यांवर बेशिस्तपणाचा आरोप करण्यात आला आहे. यातील सहा नेत्यांची पक्षश्रेष्ठींनी नुकतीच बैठक झाली. या बैठकील बोम्मईस कतील , प्रल्हाद जोशी, सीटी रवि आदी नेता या बैठकीला उपस्थित होते.
हे अकरा नेते वादग्रस्त
खासदाप रेणुकाचार्य, बसनगौडा पाटील यतनाल, मुरुगेश निरानी, प्रभु चौहान, प्रताप सिम्हा, रमेश जिगाजिनागी, दशरहल्ली मुनिराजू, एएस नदहल्ली, चरणथी मठ, थम्मेश गौड़ा और ईश्वर सिंह ठाकुर या अकरा नेत्यांवर ते वादग्रस्त विधान करीत असल्याचा आरोप आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.