Amit Shah, JP Nadda Sarkarnama
देश

BJP News : निवडणूक अन् राम मंदिराबाबत भाजपची रणनीती ठरणार; अमित शाह, नड्डा घेणार बैठक

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला...

Rajanand More

Lok Sabha Election : अयोध्येतील राम मंदिरावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला भाजपने राजकीय रंग दिल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे, तर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी कंबर कसल्याची चर्चा आहे. त्याबाबत रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे.

भाजपने (BJP) मंगळवारी सर्व राज्यामतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्लीत बोलावल्याचे समजते. प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीलाच होणार आहे. त्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) व पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) हे बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने (LokSabha Election) या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जोरकसपणे मांडणार आहे. त्यादृष्टीने पक्षाने विस्तृत आराखडा तयार केला आहे. भाजपकडून राम मंदिरासाठीचे (Ram Mandir) आंदोलन आणि मंदिराची उभारणी यावर आपली भूमिका स्पष्ट करणारे एक बुकलेट प्रसिद्ध करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक बुथवर विशेष कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत. विरोधकांनी राम मंदिर उभारणी कसे अडथळे आणले, यावरही प्रचारादरम्यान प्रकाश टाकला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिराबाबत आयोजित प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारीही भाजपकडून करण्यात आल्याचे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद केले आहे.

दरम्यान, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या भव्य-दिव्य सोहळ्याचा घाट घातला जात आहे. हा पक्षीय सोहळा वाटत असल्याची टीकाही विरोधक करीत आहेत. भाजपकडून या टीकेला जशास तसे उत्तर दिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT