narottam mishra, arjun kapoor Sarkarnama
देश

Narottam Mishra : अभिनेता अर्जुन कपूरवर भाजप नेत्याचा हल्लाबोल

arjun kapoor : समाज माध्यमांवर नेटकऱ्यांनी अर्जुन कपूरला ट्रोल केल्यानंतर आता भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा (narottam mishra) यांनी टि्वट करुन अर्जुन कपूरला उत्तर दिलं आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. दररोज एक ना एक चित्रपट आणि कलाकार यांच्या विरोधात बहिष्काराचा ट्रेंड चालवला जातो. हिंदी चित्रपटांविरोधात मागील अनेक दिवसांपासून बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर बॉलिवूडमधील येणाऱ्या कोणत्याना कोणत्यातरी चित्रपटाला विरोध केला जात आहे.

अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor)याने बायकॉट ट्रेंडवर आपले मत व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. समाज माध्यमांवर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केल्यानंतर आता भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा (narottam mishra) यांनी टि्वट करुन अर्जुन कपूरला उत्तर दिलं आहे. निराश आणि फ्लॅाप अँक्टर असे म्हटलं आहे. अर्जुन कपूर याने जनतेला धमकवल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. याबाबत मिश्रा यांनी टि्वट केलं आहे.

मिश्रा यांनी याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. एखादा निराश आणि फ्लॅाप अभिनेता जर जनतेला धमकावत असेल तर ते चुकीचे आहे. जनतेला धमकल्यापेक्षा त्याने आपल्या अभिनयाकडे लक्ष द्यावे. आपल्या चित्रपटात हिंदु देवतांना लक्ष्य करुन बायकॉटवर जनतेला धमकावणे बंद करा, आता जनता जागृत झाली आहे.

सध्या अनेक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे. त्यावर एका मुलाखतीत अर्जुन कपूर म्हणाला होता की, काही व्यक्ती चित्रपटांवर बहिष्कार टाकत आहेत. बॅालिवुडचे कलाकार यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही, हे चुकीचे आहे. आमच्या शांत राहण्याचा लोक गैरफायदा घेत आहेत. बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंडच झाला आहे. आपल्याला आता रिअँक्शन देणे गरजेचे आहे.

बॅालिवुडच्या कलाकारांनी एकत्र येत याविरोधात आवाज उठवला पाहिजे. आपण खूप अन्याय सहन करीत आहोत.

नुकत्याच काही दिवसांपासून आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांवर सोशल मीडियावर प्रचंड विरोध केला जात आहे. आता यादरम्यान, अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातील शाहरूख आणि दीपिकाचा लूक समोर आला होता. परंतु सध्या ट्वीटरवर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

'लाल सिंह चड्ढा' आणि त्यांच्या आगामी चित्रपटांना पाठिंबा देणाऱ्या कलाकारांवर बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. आता असेच काहीसे हृतिक रोशन स्टारर 'विक्रम वेधा' या चित्रपटासोबत घडत आहे. कारण, शनिवारी 'लाल सिंह चड्ढा' पाहण्यासाठी हृतिक रोशन थिएटरमध्ये गेला होता. त्याने आमिरच्या चित्रपटाच्या समर्थनार्थ ट्विट करत सर्वांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. हृतिकच्या या ट्विटने आता त्याच्यावर छाया पडल्याचे दिसत आहे.

आमिर खानचा लाल सिंह चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतरही सोशल मीडियावर त्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता ट्रोलर्स शाहरूख खानच्या पठाण चित्रपटावर देखील बहिष्कार टाकायला सुरूवात केली आहे. आता ट्वीटरवर पठाण चित्रपटावरील बहिष्कार ट्रेंड होत आहे. त्यामुळे पठाण प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटासाठी समस्या निर्माण झाली आहे. परंतु या चित्रपटावर बहिष्कार का टाकला जात आहे याचं कारण अजून समोर आलं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT