Chandru Lamani in Bribery Sarkarnama
देश

BJP MLA Bribery Row : ‘11 लाखांच्या लाचेचा खेळ’ भाजप आमदाराला महागात; कोठडीची हवा, पक्षाची इमेज डॅमेज!

BJP MLA Chandru Lamani in Bribery Row; R Ashoka, Vijayendra to Issue Notice : आमदार चंद्रू लमाणी याने कंत्राटदाराकडून मागितलेल्या 11 लाख रुपयांच्या लाच प्रकरणामुळे भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Pradeep Pendhare

Karnataka BJP : भाजप आमदार डॉ. चंद्रू लमाणी याने कंत्राटदाराकडे मागितलेल्या 11 लाख रुपयांच्या लाचेत पाच लाख रुपये घेताना पकडण्यात आलं आहे. लोकायुक्त पोलिसांनी केलेल्या कारवाईत, भाजपची कर्नाटक राज्यात पक्ष प्रतिमा चांगलीच डॅमेज झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात "ना खाऊगा, ना खाणे दुंगा", या घोषणाला पक्षाच्याच आमदाराकडून हरताळ फासला जात असल्याचं या लाचप्रकरणातून पुढं आलं आहे. यातून कर्नाटक राज्यातील पक्ष नेत्यांनी आमदार डॉ. लमाणी याला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप आमदार डाॅ. चंद्रू लमाणी याने कंत्राटदारांकडे 11 लाख रुपयांच्या लाचेची डिमांड केली होती. त्यातील पाच लाख लाचेचा पहिला हप्ता घेताना, लोकायुक्तांनी ताब्यात घेतलं. आमदार डाॅ. लमाणी सध्या न्यायालयीन (Court) कोठडीत असून, या लाचप्रकरणामुळे भाजपची कर्नाटक राज्यात प्रतिमा चांगलीच खराब झाली आहे. यामुळे शिरहट्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. चंद्रू लमाणी यांना पक्ष नोटीस बजावण्याची तयारी करत आहे.

या संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि प्रदेश भाजपचे (BJP) अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी विधानसभेत चर्चा केली आहे. या प्रकरणामुळे भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला असून, पक्षाच्या ‘इमेज’ला धक्का बसला आहे. यासाठी आमदार डॉ. चंद्रू लमाणीकडून स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक काही दिवसांत स्पष्टीकरण मागण्यासाठी डॉ. लमाणी याला नोटीस बजावणार आहेत. या प्रकरणाबाबत पुढे काय करायचे, यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आणि अखेर नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला.

कंत्राटदारांकडून लाच घेताना सापडलेल्या आमदार डॉ. लमाणी याला लोकायुक्त पोलिसांनी अटक केली. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी त्यांना दोन मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाने फटकारले

आमदार डाॅ. लमाणी याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी झाली पाहिजे. आमदार डाॅ. लमाणी याच्या वकिलांनी न्यायाधीशांना सुनावणीच्या यादीत त्याचा समावेश करण्याची विनंती केली. यामुळे संतापलेल्या विशेष लोकप्रतिनिधींच्या न्यायालयाचे न्यायाधीश संतोष भट आरोपींच्या वकिलांना फटकारले. ‘तुम्हाला जामीन का द्यावा’, असे विचारून त्यांनी लोकायुक्तांच्या विशेष सरकारी वकिलांना जामीन अर्जावर आक्षेप नोंदविण्याचे निर्देश दिले. लोकायुक्तांना 27 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे निर्देश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT