deshraj karnwal
deshraj karnwal sarkarnama
देश

आमदाराला अश्रू अनावर! ७० हजारांचे कमळ, नोकरीचा राजीनामा, तरीही तिकीट कापलं!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा (up assembly) निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे अनेक नेत्यांनी पक्ष बदलण्यास सुरवात केली आहे. पक्षश्रेष्ठींबाबत नाराज व्यक्त करीत आहेत. तर काही नेत्यांना तिकीट न मिळाल्यामुळे रडू कोसळलं. असाच एक प्रकार भाजपच्या आमदाराबाबत घडला.

भाजपचे आमदार देशराज कर्णवाल (bjp mla deshraj karnwal) हे पत्नीला तिकीट मिळण्यासाठी प्रयत्नशील होते. पण ऐनवेळी भाजपने त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे देशराज कर्णवाल यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी भाजपच्या नेत्यांचे हे षडयंत्र असल्याचे म्हटलं आहे. याबाबत आपण पक्षश्रेष्ठींची चर्चा करणार असल्याचे कर्णवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

उत्तरप्रदेशातील झबरेडाचे भाजपचे आमदार देशराज कर्णवाल हे पत्नी वैजयंती माला यांना भाजपनं उमेदवारी द्यावी, यासाठी प्रयत्नशील होते. विधानसभा लढण्यासाठी वैजयंती माला यांनी शिक्षिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. पण भाजपनं त्यांना तिकीट दिले नाही. वैजयंती माला यांचे तिकीट कापण्यामागे भाजपच्याच काही नेत्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप देशराज कर्णवाल यांनी केला आहे हे सांगत असताना त्यांना रडू कोसळलं.

कॅबिनेट मंत्री स्वामी यतीश्वरानंद आणि हरिव्दारचे खासदास रमेश पोखरियाल यांच्या कुटील कारस्थानामुळे वैजयंती माला यांना तिकीट मिळाले नसल्याचा गंभीर आरोप कर्णवाल यांनी केला आहे. भाजपकडून वैजयंती माला यांना तिकीट मिळेल या आशेनं त्यांनी आपल्या घरावर ७० हजार रुपये खर्च करुन कमळाच्या फुलांची प्रतिकृती केली आहे.

''आपल्या मनात नेहमी कमळ आहे,'' असे म्हणणारे कर्णवाल तिकीट कापल्यामुळे नाराज आहेत. या ठिकाणी कॉग्रेसमधून आलेल्या राजपाल यांना भाजपनं तिकीट दिले आहे. या सर्वामागे रमेश पोखरियाल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ''झबरेडा विकास करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली. वेळ आल्यावर याबाबतची सत्यता पक्षश्रेष्ठींना सांगणार, असे कर्णवाल यांनी यावेळी सांगितलं. हे सांगत असताना ते खूपच भावुक झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT