BJP MLA Vungzagin Valte attacked
BJP MLA Vungzagin Valte attacked  Sarkarnama
देश

Manipur News : मणिपूरमध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटला; भाजप आमदारावर प्राणघातक हल्ला, अमित शाह 'अॅक्शन मोड' मध्ये...

सरकारनामा ब्यूरो

MLA Vungzagin Valte attacked : मणिपूरमध्ये आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मैती आणि अन्य आदिवासी समुदायांमधील संघर्षाने हिंसक वळण घेतलं आहे. या हिंसचारात ९ हजारहून अधिक लोक बेघर झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याचदरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

मणिपूरमधील भाजप(BJP)चे आमदार वुंगजागिन वाल्टे यांच्यावर जमावानं प्राणघातक हल्ला केला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांची भेट घेऊन सचिवालयातून परतत असताना वाल्टे यांच्यावर इम्फाळमध्ये हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर इम्फाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथं उपचार सुरू आहेत.

कोण आहेत वाल्टे?

भाजपचे आमदार वुंगजागिन वाल्टे(Vungzagin Valte) हे कुकी समाजातील नेते आहेत. ते फिरजवल जिल्ह्यातील थानलॉन येथून तीन वेळा आमदार राहिले आहेत. मागील भाजप सरकारमध्ये ते मणिपूर(Manipur)चे आदिवासी व्यवहार आणि पहाडी मंत्री होते.

अमित शाहांचा बैठकांचा धडाका

मणिपूरमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उफाळून आलेल्या हिंसाचारामुळं केंद्र सरकारनं कठोर पावले उचलली आहेत. तसेच गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) मणिपूरमधील परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. तसेच मणिपूरच्या शेजारच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून राज्य आणि केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांचा धडाका लावला आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सुरु असलेल्या हालचालींची बारकाईने माहिती घेत आहेत.

इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा बंद

मणिपूरमधील हिंसाचारामुळं ९ हजारहून अधिक लोक बेघर झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ५५ ​​तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती लष्करानं दिली आहे. संपूर्ण परिसरात इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा बंद करण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT