MP Arvind Sharma Latest Marathi News
MP Arvind Sharma Latest Marathi News Sarkarnama
देश

ब्राम्हण मुख्यमंत्री हवा! खासदाराच्या वक्तव्यानं भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर

सरकारनामा ब्युरो

चंदीगड : हरयाणातील भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहेत. रोहतक येथील भाजप खासदार अरविंद शर्मा यांनी थेट मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर निशाणा साधला आहे. ते कोणत्याही कामासाठी डोकं चालवत नाहीत, असं ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी राज्यात ब्राम्हण मुख्यमंत्री हवा, असंही वक्तव्य केल्यानं भाजपमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच भाजपमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. (MP Arvind Sharma Latest Marathi News)

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीआधीच अरविंद शर्मा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शर्मा यांनी रोहतक मतदारसंघात दीपेंद्र सिंह हुडा यांना पराभूत केले आहे. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी खट्टर यांच्याविरोधात मोर्चा उघडल्याचे स्पष्ट झाले आहे. '66 वर्षांपुर्वी हरयाणामध्ये भगवत दयाल शर्मा यांच्या रुपाने पहिला मुख्यमंत्री मिळाला. पण त्यानंतर राज्यात कुणीही ब्राम्हण मुख्यमंत्री बनले नाही,' असं शर्मा म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली आहे. (Arvind Sharma criticizes CM Manohar Lal Khattar)

मी याविषयी आतापर्यंत बोललो नाही. पण हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगणार आहे. मला माझ्यासाठी काही नको. मला फक्त लोकांची सेवा करायची आहे. 2014 मध्ये राम विलास शर्मा यांच्यासोबत धोका झाला आहे. राज्यात पहिल्यांदा सरकार बनत असताना त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं नाही, अशी टीकाही शर्मा यांनी केली आहे.

राम विलास शर्मा यांनी पक्षासाठी सर्वकाही केले. त्यांचं नाव वापरून सत्ता आली. पण नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी नाराजी शर्मा यांनी व्यक्त केली आहे. राम विलास शर्मा हे 2014 मध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शर्मा यांच्या वक्तव्याकडे भाजपने कानाडोळा केला आहे. प्रदेशाध्यक्ष ओ. पी. धनकर यांनी अशाप्रकारची वक्तव्य करू नयेत, असं म्हटलं आहे. दरम्यान, शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे पक्षातील काही घटकांतील लोकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पक्षातील सर्व समाजातील प्रतिमेला तडा जाऊ शकतो, अशी भीती काही नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT