Winter session of Parliament 2022
Winter session of Parliament 2022 
देश

Uniform Civil Code : राज्यसभेत भाजप खासदाराकडून समान नागरी कायद्याचे विधेयक दाखल

मंगेश वैशंपायन

Uniform Civil Code : समान नागरी संहिता कायद्याबाबत राज्यसभेत एका खासगी सदस्य विधेयकाद्वारे `चाचपणी` केल्यानंतर आठवडाभरात भाजपच्या (BJP) वतीने लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणारे तसेच खासगी सदस्य विधेयक आणण्यात आले आहे. भाजप खासदार हरनाथसिंह यादव यांनी हे विधेयक आणले आहे.

समान नागरी संहिता विधेयक आले तेव्हा राज्यसभेत मागच्या शुक्रवारी जबरदस्त गदारोळ झाला होता. संघपरिवाराचा छुपा अजेंडा राज्यसभेच्या मार्फत आणला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र विरोधाला न जुमानता सरकारने हे विधेयक राज्यसभेत सादर करवूनच घेतले व ते संसदेच्या पटलावर कायम अस्तित्वात राहील याची तजवीज करून ठेवली.

त्यापाठोपाठ आज लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे विधेयक भाजपने थेट तशाच पध्दतीने राज्यसभेत आणले. यादव यांनी आपल्या विधेयकात,लोकसंख्येच्या वाढीमुळे गंभीर संकट निर्माण झाले असल्याचे सांगताना लोकसंख्या वाढ हीच देशाच्या आर्थिक विकासाला मारक ठरल्याचा सूर व्यक्त केला आहे. यादव यांच्या विधेयकात म्हटले की लोकसंख्येमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे गेल्या काही दशकांपासून एक भयानक स्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध संसाधने आणि सर्वांगीण विकास यांच्यातील असमतोल दूर करून आवश्यक संसाधने प्रदान करण्यात कोणतेही सरकार यशस्वी होऊ शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT